पेट्रोलनंतर आता भडकले गॅस सिलिंडरचे दर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

ग्राहकांना मिळणाऱ्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर 42 रुपयांनी तर अनुदानित सिलिंडरचे दर 2.34 रुपयांनी वाढले आहेत.

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे वाढत चालले दर त्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. ग्राहकांना मिळणाऱ्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर 42 रुपयांनी तर अनुदानित सिलिंडरचे दर 2.34 रुपयांनी वाढले आहेत.

मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. इंधनाच्या दरवाढीनंतर आता दिल्लीत अनुदानित गॅस सिलिंडरचे दर 2.34 रुपयांनी तर विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 48 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत 14.2 किलो वजनाच्या अनुदानित गॅस सिलिंडरचे दर 493.55 रुपये झाले तर विनाअनुदानित सिलिंडरचे दर 698.50 रुपये झाले आहेत.

LPG cylinders

सध्या कोलकातामध्ये अनुदानित गॅस सिलिंडरचे दर 496.65 रुपये, मुंबईत 491.31 रुपये तर चेन्नईमध्ये 481.84 रुपये झाले आहेत. तसेच कोलकातामध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर 723.50 रुपये, चेन्नईमध्ये 712.50 रुपये तर मुंबईमध्ये 671.50 रुपये इतके झाले आहेत. 

Web Title: LPG cylinders to be costlier in another setback after fuel price hike in Delhi petrol prices increases by Rs 42