
LPG Price Hike : बापरे, गेल्या १० वर्षात घरगुती गॅसच्या दरात पडला एवढा मोठा फरक
LPG Price Hike : महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री तर लावलीच आहे शिवाय एलपीजी गॅसच्या किंमतीने सर्व बजेटच बिघडवून टाकलं आहे. त्यातही होळीच्या तोंडावर याची किंमत वाढवल्याने गॅस वितरण कंपन्यांनी आणखी ताण वाढवलाय. जर महागाईचा विचार केला तर सगळ्यात महाग झालेल्या वस्तूंकडे नजर टाकली तर त्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूच जास्त आहेत. त्यात २०१४ पासून गॅस सिलेंडर अडीचपट महाग झाले आहेत.
५० रुपये प्रति सिलेंडर वाढलेत दर
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस वितरण कंपन्या एलपीजीच्या किंमतीत संशोधन करतात. १ मार्च २०२३ ला १४.२ किलो घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग करण्यात आला. ही दरवाढ ८ महिन्यांनंतर करण्यात आली आहे. यासोबतच कमर्शियल गॅस सिलेंडर ३५०.५० रुपयांनी वाढवण्यात आले आहे.
२०१४ नंतर ६९३ रुपयांनी महागलं सिलेंडर
सध्याचे वाढलेले दर आणि २०१४ पासून झालेली वाढ याची तुलना केली तर दिल्लीला ४१० रुपयांचे सिलेंडर आज १,१०३ रुपयांना मिळते. यात ६९३ रुपयांची वाढ झाली आहे.
२०१४ पासून काही वेळा हे दर कमीपण करण्यात आले होते. पण याचा आजवरचा आलेख तपासला तर बहुतेक वेळा दरवाढ झाल्याने हा आलेख चढताच आहे.
दिल्ली वगळता इतर शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर
मुंबई - १०५२.५० रुपये वरुन - ११०२.५ रुपये
कोलकत्ता - १०७९ रुपये वरुन ११२९ रुपये
चेन्नई - १०६८.५० रुपये वरुन १११८.५ रुपये
कमर्शियल सिलेंडरचे दर
दिल्ली - १७६९ रुपयांवरुन २११९.५ रुपये
मुंबई - १७२१ रुपयेवरुन २०७१.५ रुपये
कोलकत्ता - १८७० रुपयांवरुन २२२१.५ रुपये
चेन्नई - १९१७ रुपयांवरुन २२६८ रुपये.