भारतीय लष्कराने केले 21 दिवसात 18 दहशतवादी ठार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 मार्च 2019

जैश-ए-महंम्मदचा मुदस्सिर हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. कामरान आणि मुदस्सर हे पुलवामा हल्ल्यातील मुख्य दहशतवादी भारतीय सुरक्षा दलाने ठार केले. - लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लो 

श्रीनगर : येथे थोड्यावेळापूर्वीच भारतीय लष्काराकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी 15 व्या कोरचे जनरल ऑफिसर कमांडींग लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लो आणि काश्मीरचे पोलिस महानिरिक्षक एस. पी. पानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

या पत्रकार परिषदेत हवाई दलाकडून सांगितल्या गेलेले महत्त्वाचे मुद्दे :

  • 21 दिवसात 18 दहशतवादी ठार केले.
  • 14 जैशचे दहशतवादी ठार. तसेच 2 हिज्ब दहशतवादी आणि 2 लष्कर दहशतवादी ठार.
  • 18 पैकी पुलवामामध्ये 3 जैश-ए-महंम्मदचे दहशतवादी ठार.
  • पुलवामा हल्ल्ल्याचा कट रचणारा ठार.
  • जैश-ए-महंम्मदचा कमांडर सुरक्षा दलाने ठार केला.
  • जैश-ए-महंम्मदचा मुदस्सिर हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. कामरान आणि मुदस्सर हे पुलवामा हल्ल्यातील मुख्य दहशतवादी भारतीय सुरक्षा दलाने ठार केले. - लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लो
  • जैश-ए-महंम्मदवर आमचे जास्त लक्ष राहील. - लेफ्टनंट जनरल ढिल्लो
  • आम्ही जितकी जोखीम घेतोय तितकी जास्त काळजीही आम्ही घेतोय. आम्ही स्थानिकांना काहीही त्रास होणार नाही याची काळजी घेत आहे. पण आम्ही आमचे ऑपरेशन मागे घेणार नाही. - लेफ्टनंट जनरल ढिल्लो
  • आम्ही यापुर्वीही घरच्यांना आव्हान केले होते. की त्यांनी त्यांच्या मुलांना घरी परत बोलवावे, आमचे आधी असेच प्रयत्न राहतील. - एस. पी. पानी, पोलिस महानिरिक्षक, काश्मीर
  • जोपर्यंत जम्मू काश्मीरमधील सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करत नाही तोपर्यंत ऑपरेशन थांबवणार नाही. - लेफ्टनंट जनरल ढिल्लो 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lt Gen KJS Dhillon addressing a press conference in Srinagar on Monday