esakal | Viral Video : जिल्हा न्यायाधीशांस टाेल मॅनेजरने शिकविला नियमांचा धडा; पैसे दिल्यानंतरच साेडले वाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video : जिल्हा न्यायाधीशांस टाेल मॅनेजरने शिकविला नियमांचा धडा; पैसे दिल्यानंतरच साेडले वाहन

आपण इतके सुसंस्कृत आहात तर आपण आधी गाडी बाजूला लावा. मग आपण बोलू असेही टाेल मॅनेजरने संबंधित न्यायाधीशांना विनंती केली.

Viral Video : जिल्हा न्यायाधीशांस टाेल मॅनेजरने शिकविला नियमांचा धडा; पैसे दिल्यानंतरच साेडले वाहन

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : कोरोना संक्रमण कालावधीमधील (सुमारे सहा महिन्यांपुर्वीचा) एक व्हिडिओ आज Social Media वर चर्चेचा विषय बनला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बर्‍याच टोल प्लाझावर (Toll Plaza) टोल टॅक्स न भरता प्रवास करणा-या जिल्हा न्यायाधीशांना बरेली ते मुरादाबाद दरम्यान टोलवरील नियमांचे धडेच गिरवावे लागल्याची घटना घडली आहे. पाच सप्टेंबर 2020 मधील या प्रकरणात टोल व्यवस्थापकाने जिल्हा न्यायाधीशांकडून 80 रुपयांचा टोल घेऊनच वाहन साेडल्याने आज नेटीझन्स संबंधित टाेल मॅनेजरचे काैतुक करीत आहेत. टाेल मॅनेजरची ही कृती साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बरेली ते मुरादाबाद दरम्यान एका ठिकाणी टोल टॅक्स न भरता गाडी पुढे नेण्याच्या जिल्हा न्यायाधीशाच्या आग्रहामुळे त्यांच्या वाहनाच्या पाठीमागे खूप माेठी रांग लागते. तेव्हा टोल व्यवस्थापकाला समोर यावे लागले. मॅनेजरने त्यांना टोल टॅक्स भरण्यास सांगितले, परंतु जिल्हा न्यायाधीशांनी आग्रह धरल्यावर टोल मॅनेजरनेही कठोर नियमात सांगितले, नियमातून पैसे द्या. देशात लोकांचे हक्क आहेत, परंतु हक्कांचा फायदा घेणा-यांची कमतरता नाही असेही मॅनेजर म्हणताना दिसत आहे. साेशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर जिल्हा न्यायाधीशांवर टोल वादावरून वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत.

टोल बूथवर जेव्हा जिल्हा न्यायाधीशांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तेथील कर्मचा-यांनी टाेल व्यवस्थापकास बाेलाविले. न्यायाधिशांचा युक्तिवाद असा होता मी राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून आलाे तेथील बूथवर टोल भरलेला नाही. येथे का भरु. त्यावर व्यवस्थापकाने त्यांना टाेल भरावा लागेल असे सांगितले. तसेच नियमांसह कायद्याचा पाढाच वाचला. टोल व्यवस्थापक म्हणताे हक्कांनुसार उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना टोलची सवलत माफी आहे परंतु आपण जिल्हा न्यायाधीश आहात आणि आपल्या हट्टामुळे लेन ब्लॉक झाली आहे.

तुम्ही तुमच्या हक्कांचा चुकीचा फायदा घेतला आहे आणि नियमांपेक्षा जास्त काही नाही. तुम्ही 80 रुपये द्या. येथे आपल्याला टोल भरावा लागेल. टोलवर 10 मिनिटे गाडी उभी असतानाही जिल्हा न्यायाधीशांनी टोल मॅनेजरशी बरीच चर्चा केली पण मॅनेजरने न्यायाधीशांशी काहीही बोलणे एेकले नाही. तुम्ही चुकीची मागणी करीत आहात असे म्हणत पैसे दिल्यावर वाहन साेडण्यात आले आहे.  
तुमचे सिम कार्ड बंद हाेईल असा SMS येत असेल तर Reply देऊ नका; BSNL चे जागाे ग्राहक जागाे अभियान 

I LOVE KARAD नंतर शहराच्या सौंदर्यात आणखी भर; टाकाऊपासून तयार झालेली शिल्पे ठरताहेत आकर्षण 

loading image
go to top