हज हाऊस बाहेरील भिंतींना भगवा रंग

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जानेवारी 2018

सहारनपूर येथील उलेमांनी म्हटले आहे, की सरकार असे कृत्य करून धार्मिक भावना चिरडण्याचा प्रय़त्न करत आहे. योगी सरकारला माझी विनंती आहे, की त्यांनी हज हाऊसचे भगवेकरण करू नये.

लखनौ - उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सचिवालयाची इमारत भगव्या रंगात रंगविल्यानंतर आता लखनौमधील हज हाऊसच्या बाहेरील भिंतींना भगवा रंग दिला आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला असून, विरोध करण्यात येत आहे.

हिरवा आणि पांढरा रंग असलेली हज हाऊस बाहेरित भिंत भगव्या रंगाने रंगविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटनांकडून विरोध दर्शविण्यात येत आहे. सहारनपूर येथील उलेमांनी म्हटले आहे, की सरकार असे कृत्य करून धार्मिक भावना चिरडण्याचा प्रय़त्न करत आहे. योगी सरकारला माझी विनंती आहे, की त्यांनी हज हाऊसचे भगवेकरण करू नये.

उत्तर प्रदेशात सर्वच शासकीय कार्यालये भगव्या रंगाने रंगविण्याचे आदेश आहेत. एवढेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने विजय मिळविलेल्या महापालिका इमारतींचा रंगही भगवा करण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ हे सतत भगवी वस्त्रे परिधान करून असतात. 

Web Title: Lucknow Haj House painted saffron by Yogi Adityanath government