'यूपी'त लवकरच गायीच्या दुधाचा प्रसाद

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

दुग्धोत्पादन मंत्र्यांची माहिती; सरकार विक्रीदरही वाढविणार

लखनौ: उत्तर प्रदेश सरकार नवरात्रीपर्यंत राज्यातील सर्व मंदिरांमध्ये गायीच्या दुधापासून तयार करण्यात आलेला प्रसाद उपलब्ध करून देण्याबाबत गांभीर्याने विचार करते आहे. राज्याचे दुग्धोत्पादनमंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी ही माहिती दिली. सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांतूनच ही मिठाई तयार करण्याचा आमचा विचार असून, हीच मिठाई विविध देवस्थानांना उपलब्ध करून दिली जाईल.

राज्यामध्ये गायीच्या दुधाची लोकप्रियता वाढविण्यासाठी सरकारने ही पाऊले उचलली आहेत. अयोध्या, विंध्याचल आणि काशी विश्‍वनाथाच्या मंदिरामध्ये गायीच्या दुधापासून तयार करण्यात आलेला प्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे. नवरात्रीपर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा आमचा विचार असल्याचे त्यांनी नमूद केले. गोपालनास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार गायीच्या दुधाच्या विक्रीदरामध्येही वाढ करण्याच्या विचारात आहे. सद्यःस्थितीमध्ये गायीच्या दुधाचा दर हा 22 रुपये प्रतिलिटर एवढा असून म्हशीच्या दुधास 35 रुपये प्रतिलिटर एवढा दर मिळतो. भविष्यामध्ये गायीच्या दुधाचा दर 42 रुपये प्रतिलिटरवर नेला जाणार आहे यामुळे गोपालन हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. छत्तीसगडमध्ये गायीच्या दुधास 60 रुपये प्रतिलिटर एवढा दर मिळतो, तर मथुरेमध्ये तेच दूध 45 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते.

बटाटे, बिटापासून मद्य
योगी सरकार बटाटे आणि बिटापासूनही मद्यनिर्मिती करणार असून अन्य ब्रॅंडेड मद्यापेक्षा हे मद्य कमी घातक असेल. या मद्याचा लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होणार नाही तसेच लोकांची मद्यप्राशनाची सवयही सुटेल असे अबकारी विभागाने म्हटले आहे. या मद्यनिर्मितीसाठी योगी सरकार 1 लाख मेट्रिक टन बटाट्याची खरेदी करणार आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

Web Title: lucknow news Cows milk and uttar pradesh