गोरखपूरमधील मृत्यूचे तांडव: राज्य सरकारला प्रतीक्षा अहवालाची

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

लखनौ : गोरखपूरमधील बाबा राघवदास रुग्णालयातील ऑक्‍सिजनची कमतरता हा गंभीर गुन्हा असून याप्रकरणी राज्य सरकार कोणालाही माफ करणार नाही. आम्ही सध्या तपास अहवालाची प्रतीक्षा करत असून, तो प्राप्त झाल्यावर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथसिंह यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

रुग्णालयातील ऑक्‍सिजनचा पुरवठा जेव्हा पूर्णपणे बंद करण्यात आला होता, त्या दरम्यान एकाही बालकाचा मृत्यू झाला नव्हता. मुख्य सचिव राजीवकुमार यांच्या नेतृत्वाखालील समिती या घटनेचा तपास करत असून, ती लवकरच आपला अहवाल सरकारदरबारी सादर करेल, असेही त्यांनी नमूद केले.

नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालावरून राज्यातील मेंदूज्वराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे आढळून आले आहे, ही एक चांगली बातमी आहे. मेंदूज्वराच्या समूळ उच्चाटनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी राज्यभर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. गोरखपूरमधील रुग्णालयास केल्या जाणाऱ्या ऑक्‍सिजनच्या पुरवठ्याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, की दिल्लीतील तीन सदस्यांची एक टीम याचा तपास करते आहे. ऑक्‍सिजनपुरवठा करणाऱ्या कंपनीचे बिल थकले होते का? याबाबत वितरक, पुरवठादार आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनामध्ये नेमका कोणता करार झाला होता, या सर्व बाबी सध्या चौकशीच्या कक्षेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: lucknow news gorakhpur hospital issue and government