यूपीत सरकारी इमारतींना आता भगवा रंग

वृत्तसंस्था
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

लखनौ: उत्तर प्रदेशमध्ये सरकारी बसनंतर आता सरकारी इमारतींवरही भगवा रंग दिसणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्री कार्यालयापासून भगवा रंग देण्यास सुरवात झाली आहे. पांढऱ्या रंगाच्या ऍनेक्‍सी भवन इमारतीला आता भगवा रंग देण्याचे काम सुरू झाले आहे.

सरकारी इमारतींना रंग देण्यासाठी मोठ्या संख्येने मजूर कामाला लागले आहेत. सुमारे 500 लिटर भगव्या रंगाची ऑर्डर सरकारकडून दिल्याचे सूत्राने सांगितले. योगी सरकार सत्तारुढ झाल्यानंतर सरकारी कामकाजात भगव्या रंगाचा वापर वाढला आहे. सरकारी कार्यक्रमांच्या मंडपापासून ते मुख्यमंत्री कार्यालयात वापरण्यात येणारा टॉवेलदेखील भगव्या रंगाचा आहे. कानपूरमध्ये आलेल्या क्रिकेट संघाचे स्वागतदेखील भगव्या रंगाच्या कपड्यांनीच करण्यात आले होते. तसे पाहिले तर आपल्या रंगाची छाप राज्यावर सोडण्याची परंपरा नवीन नाही. यापूर्वी समाजवादी पक्ष, बसप सरकारनेदेखील आपल्या आवडीच्या रंगाने राज्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मायावती सरकारने रस्त्यावरील दुभाजकांपासून ते बसपर्यंत निळा आणि पांढऱ्या रंगाचा वापर केला होता; तर समाजवादी पक्षाने त्यास समाजवादी रंग दिला. मात्र या दोघांच्याही पुढे जाऊन योगी सरकारने सरकारी इमारतींना रंग देण्याची परंपरा सुरू केली आहे.

Web Title: lucknow news UP government Saffron colors of the buildings now