मायावतींची नजर फुलपूरवर

शरद प्रधान
गुरुवार, 27 जुलै 2017

पोटनिवडणूक झाल्यास समीकरणे बदलणार

लखनौ: बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत सर्व राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत. "यूपी'तील लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव जिव्हारी लागल्याने बहनजींनी आक्रमक रूप धारण करत भाजपला धक्का देण्याचे नियोजन आखले आहे. भाजप नेते केशवप्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या फुलपूरमधील पोटनिवडणुकीसाठी बहनजींनी कंबर कसली आहे. याबाबत "बसप'कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरीसुद्धा मायावतींचे नाव निश्‍चित मानले जात आहे.

मायातींना शह देण्यासाठी भाजपनेही मौर्य यांना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊ नका, वेळ पडलीच तर केंद्रामध्ये या, अशा सूचना दिल्याचे समजते. यामुळे उत्तर प्रदेशात जीव अडकलेल्या मौर्य यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. फुलपूर हा मायावतींचा हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. दलित आणि जाट यांचे प्राबल्य असणाऱ्या या भागाने मायावतींना नेहमीच साथ दिली आहे. या मतदारसंघातील सर्वच विरोधकांनी मायावतींना पाठिंबा दिल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. विरोधक येथे आपली सगळी ताकद मायावतींच्या मागे लावतील आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही महाआघाडीची सुरवात असेल अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

...तर तो वर्मी घाव
फुलपूरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाला, तर तो पक्षाच्या वर्मी घाव असेल. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा ही जोखीम स्वीकारायला तयार नाहीत, त्यामुळे फुलपूरच्या लढाईपासून मायावतींना दूरच ठेवले जावे, असे भाजपश्रेष्ठींचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रिपदामध्ये जीव अडकलेले मौर्य हे केंद्रामध्ये येण्यास फारसे उत्सुक नसल्याचे बोलले जाते. आता ही कोंडी शहा कशी फोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: lucknow news mayawati and election