लोकदलाच्या नेतृत्वाखाली मुलायम यांची नवी आघाडी?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

लखनौ : सध्या राजकीय विजनवासामध्ये गेलेले समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि त्यांचे बंधू शिवपाल हे लवकरच "लोकदला'च्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याच्या विचारात आहेत अशी माहिती "लोकदला'चे अध्यक्ष सुनील सिंह यांनी दिली. समाजवादी पक्षातील अंतर्गत संघर्ष मिटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत त्या पार्श्‍वभूमीवर मुलायम, हे वेगळा मार्ग निवडू शकतात, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

मध्यंतरी मुलायमसिंह यांनी लोहिया ट्रस्टवरून अखिलेश यांचे निष्ठावंत रामगोपाल यादव यांची हकालपट्टी केली होती, त्यानंतर हा राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला होता. मुलायमसिंह हे "लोकदला'चे संस्थापक- सदस्य आहेत. भविष्यामध्ये धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्यासाठी शिवपाल हे त्यांना मदत करतील, सोमवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत याची घोषणा होणे अपेक्षित असल्याचे सुनील सिंह यांनी स्पष्ट केले. याआधी शिवपाल यांनीही जातीयवादी शक्तींबरोबर दोन हात करण्यासाठी "समाजवादी सेक्‍युलर फ्रंट'ची स्थापना करण्याची घोषणा केली होती. समाजवादी पक्षातील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर शिवपाल समर्थक संभ्रमात पडले आहेत. शिवपाल यांना आताच पुढील रणनीती निश्‍चित करावी लागणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

पक्षाची पार्श्‍वभूमी
लोकदलाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेली असलीतरीसुद्धा त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. ज्येष्ठ समाजवादी नेते चरणसिंह यांनी 1980 मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. स्वत: मुलायमसिंह यादवदेखील या पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. "शेत नांगरणारा शेतकरी' हे या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. या बळावरच चरणसिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते.

Web Title: lucknow news mulayamsingh yadav political party