सध्यातरी नवा पक्ष नाही: मुलायमसिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

लखनौ : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी तमाम तर्कवितर्कांना पूर्णविराम देताना सध्यातरी आपण कोणताही नवा पक्ष स्थापन करणार नसल्याचे आज येथे स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना मुलायमसिंह यांनी सांगितले, की मी सध्या नवा पक्ष स्थापन करणार नाही. यासंबंधी कधी वेळ आली तर त्याबाबतची माहिती दिली जाईल. समाजवादी विचारधारेच्या लोकांनी समाजवादी पक्षात सहभागी होऊन पक्ष मजबूत करण्याचेही आवाहन त्यांनी केले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर आनंदित झालेले त्यांचे पुत्र, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी "नेताजी : मुलायम : झिंदाबाद, समाजवादी पार्टी झिंदाबाद' असे ट्विट केले. मुलायम यांचा हा बदललेला पवित्रा अखिलेश यादव यांचे विरोधक शिवपाल यादव गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवपाल यांनी मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी सेक्‍युलर मोर्चा स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. मुलायमसिंह यांनी आज पत्रकार परिषद बोलावल्यानंतर त्यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. उल्लेखनीय बाब म्हणजे, पत्रकार परिषदेला शिवपाल अनुपस्थित होते. त्याचे कारण विचारले असता, ते कामानिमित्त इटावाला गेले असल्याचे मुलायमसिंह यांनी सांगितले.

त्यांनी या वेळी केंद्र सरकार, तसेच राज्य सरकारवर टीकाही केली. ते म्हणाले, की केंद्र सरकारने दिलेल्या कुठल्याही आश्वासनाची तीन वर्षांत पूर्तता झालेली नाही. पेट्रोल- डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. बनारस हिंदू विद्यापीठातील मुली सुरक्षित नाहीत. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती वाईट बनली आहे. शेतकऱ्यांची अवस्थाही कठीण बनली आहे. योगी आदित्यनाथ सरकारमध्ये शेतकऱ्यांची फरफट होते आहे. या वेळी मुलायमसिंह यांनी विरोधकांना भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहनही केले.

अखिलेश यांनी धोका दिला
समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष असलेले मुलायमसिंह यांनी पुत्र अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, की अखिलेश माझा मुलगा आहे, त्यामुळे माझ्या शुभेच्छा कायमच त्यांच्या पाठीशी राहतील. मात्र, त्यांच्या निर्णयाशी मी सहमत नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत येत्या काळात त्यांच्याशी चर्चा करणार आहे. अखिलेश यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचे अध्यक्षपद सोडू असे सांगितले होते. मात्र, त्यांनी आपला शब्द पाळला नाही. जी व्यक्ती आपल्या शब्दाला जागत नाही आणि ज्याने आपल्या पित्याला धोका दिला आहे, तो इतरांना न्याय कसा देईल!

Web Title: lucknow news Not a new party: Mulayam Singh yadav