भारत शक्तिशाली देशांपैकी एक: राजनाथसिंह

वृत्तसंस्था
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

लखनौ: भारत आता पूर्वीसारखा कमकुवत देश राहिलेला नाही. याची जाणीव आता जगाला होत असून, भारत हा जगातील सर्वांत शक्तिशाली देशांपैकी एक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले.

लखनौ: भारत आता पूर्वीसारखा कमकुवत देश राहिलेला नाही. याची जाणीव आता जगाला होत असून, भारत हा जगातील सर्वांत शक्तिशाली देशांपैकी एक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले.

येथील एका वृत्तपत्राद्वारे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. राजनाथसिंह म्हणाले, ""आंतरराष्ट्रीय पटलावर भारताचे महत्त्व वाढीस लागले आहे. सद्यःस्थितीला भारतीय अर्थव्यवस्था ही वेगाने विकसित होणारी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आली आहे. सध्या सरकारवर जेवढी टीका होत आहे, त्यातुलनेत कामांची अधिक प्रशंसा होत असून, आम्ही जी ध्येये समोर ठेवली होती, ती गाठण्यात आम्हाला यश आले आहे.''
या तीन वर्षांच्या कारकिर्दीत सरकारची कामगिरी कशी राहिली, याबद्दल विचारलेल्या एका प्रश्नास उत्तर देताना राजनाथसिंह म्हणाले, ""आम्ही स्वतःचे मूल्यांकन स्वतःच करू इच्छित नाही; मात्र या कालावधीत देशाची ताकद आणि विश्वासार्हता वाढली आहे.''

Web Title: lucknow news One of India's powerful countries: Rajnath Singh