फारूखाबाद येथे मुलीवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

लखनौ : राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असतानाच येथील फारुखाबाद पोलिस लाइन्समध्ये पोलिस आणि त्याच्या मित्राने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फत्तेहगड कोतवाली पोलिस ठाण्यात याप्रकरणी पोलिस अधीक्षक दयानंद मिश्रा यांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला आज वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी ही बसने आपल्या मामाच्या घरी जात होती. त्याचवेळी उपेंद्र या व्यक्तीने पीडित मुलीला आपण कारमधून फरुकाबादला सोडतो असे सांगून तिला बसमधून खाली उतरण्यास सांगितले. मात्र, आरोपी उपेंद्र याने आपला मित्र अजयकुमार याच्याबरोबर पोलिसांची शंभर नंबरच्या गस्तीवरील व्हॅन पोलिस लाइनमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलीने या दोघांच्या हातून आपली सुटका करून घेत पोलिस ठाणे गाठले. त्याचप्रमाणे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीही शहाजहानपूर येथे अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील दोन्ही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: lucknow news rape in farrukhabad