नव्या तेजस एक्‍स्प्रेसला 18 मार्चला हिरवा झेंडा

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

लखनौ-आनंदविहार मार्गावर गाडी धावणार

लखनौ: लखनौ-आनंदविहारदरम्यान सुरू होत असलेल्या तेजस एक्‍स्प्रेस या निमवेगवान गाडीला रेल्वेमंत्री पीयूष गोयल येत्या 18 मार्च रोजी हिरवा झेंडा दाखवतील. सध्या लखनौ-दिल्लीदरम्यान धावणारी डबलडेकर रेल्व गाडी आता जयपूरपर्यंत जाणार असून, तिलाही गोयल हिरवा झेंडा दाखवतील. केंद्रीय गृहमंत्री आणि लखनौचे खासदार राजनाथसिंह या वेळी उपस्थित राहणार आहेत. गोमतीनगर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासह अनेक कार्यक्रम या वेळी होणार आहेत.

रेल्वेच्या ताफ्यातील तेजस एक्‍स्प्रेस ही निमवेगवान गाडी पूर्ण वातानूकुलित असून, त्यात स्वयंचलित दरवाजांसह अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या गाडीचा सर्वसाधारण वेग ताशी 130 किलोमीटर असून, काही विभागांत ती ताशी 180 किलोमीटरच्या वेगाने धावेल. लखनौ-आनंदविहार तेजस एक्‍स्प्रेस आठवड्यातून सहा वेळा धावणार असून, या प्रवासात ती फक्त कानपूरला पाच मिनिटे थांबणार आहे.

Web Title: lucknow news tejas express piyush goyal