'यूपी'त दोन दिवसांत पंधरा चकमकी

वृत्तसंस्था
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

पोलिस कारवाईत 1 ठार; 24 जणांना अटक

लखनौ: उत्तर प्रदेश पोलिस दलाने राज्यातील गुन्हेगारांविरोधात उघडलेल्या व्यापक मोहिमेअंतर्गत गेल्या दोन दिवसांत चकमकीच्या पंधरा घटना घडल्या आहेत. यात एक गॅंगस्टर ठार झाला असून, किमान 24 गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्यात आल्याची माहिती पोलिस प्रवक्‍त्याने दिली.

बुलंदशहर, शामली, कानपूर, सहारणपूर, लखनौ, बागपत, मुझ्झफरनगर, गोरखपूर, हापूर आणि मेरठ अशा दहा जिल्ह्यांत पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत 24 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, 25 हजार रुपयांचे बक्षीस असलेला गॅंगस्टर इंदरपाल याचा काल (ता.2) "एसटीएफ'शी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. त्याच्यावर खून, लूटमारीचे तीस गुन्हे दाखल होते.

गुन्हेगारांचे आश्रयस्थान असलेल्या बुलंदशहर, शामली जिल्ह्यात केलेल्या कारवाईत पोलिसांनी देशी बनावटीची शस्त्रे, दुचाकी तसेच लुटलेला ऐवज जप्त केला असून, दहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गोरखपूरमधील चकमकीत दोन गुन्हेगार व दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे प्रवक्‍त्याने सांगितले.

Web Title: lucknow news uttar pradesh firing crime