'यूपी'त मदरशांच्या देशभक्तीची परीक्षा

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन, राष्ट्रगीत सक्तीचे; मदरसाचालक नाराज

लखनौ: उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत म्हणणे सक्तीचे करण्यात आले असून, या कार्यक्रमांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सरकारला सादर करावे लागेल. यासाठी राज्य सरकारने वेगळे पत्रक देखील प्रसिद्ध केले आहे. राज्य सरकारच्या या पत्रकास मदरसाचालकांनी विरोध केला असून, सरकारच आमच्या देशभक्तीवर संशय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेने 3 ऑगस्ट रोजी यासंबंधीचे पत्रक काढले असून, त्यामध्ये स्वातंत्र्यदिनी कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करावे याचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. अशा प्रकारचे उपक्रम भविष्यामध्ये राबविता यावेत म्हणून त्याचे छायाचित्रण करणे अनिवार्य करण्यात आले असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासही सांगण्यात आले आहे. याआधीही राज्य सरकारने राष्ट्रीय सणांच्या दिवशी सर्व मदरशांनी ध्वजवंदन करावे, असे म्हटले होते.

अधिकाऱ्यांची धावाधाव
विविध मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिनी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचे छायाचित्रण करण्याची जबाबदारी जिल्हा अल्पसंख्याक अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. यामुळे स्वातंत्र्यदिनी अनेक अधिकाऱ्यांना धावाधाव करावी लागेल. अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या उत्तर प्रदेशात 8 हजार मदरसे असून, त्यातील 560 मदरशांना राज्य सरकारकडून थेट अनुदान मिळते.

कार्यक्रमांचे स्वरूप
सकाळी आठ वाजता ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत होईल, त्यानंतर थोर स्वातंत्र्यसैनिक आणि महापुरुषांना आदरांजली अर्पण करण्यात येईल. राष्ट्रीय एकात्मता हे सूत्र डोळ्यांसमोर ठेवून विविध कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे, असे राज्य सरकारच्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिक्षण परिषदेने हिंदी आणि उर्दू भाषेतील राष्ट्रगीताचा मजकूर मदरशांकडे पाठविला आहे.

Web Title: lucknow news uttar pradesh madarsha and independence day