तो पडला रक्ताच्या थारोळ्यात; बघ्यांचे मदतीऐवजी फोटोसेशन!

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

बंगळूर : अपघातग्रस्त झाल्याने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किशोरवयीन युवकाला मदत करण्याऐवजी बघ्यांनी असंवेदनशीलपणे व्हिडिओ शुटिंग करत छायाचित्रे काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर काही संवेदनशील व्यक्तींना युवकाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्याचा मृत्यु झाला आहे.

बंगळूरपासून 380 किलोमीटर अंतरावरील कोप्पल गावात ही घटना घडली. अनवल अली नावाचा 18 वर्षांचा किशोरवयीन युवक रस्त्याने सायकलवरून जात होता. राज्यातील परिवहन मंडळाच्या बसने त्याला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे अनवर रस्त्यावर रक्‍ताच्या थारोळ्यात पडला. रस्त्यावरून जाणाऱ्या बघ्यांनी त्याला मदत करण्याऐवजी त्याचे फोटो काढून घेत व्हिडिओ शूटींग केले. त्यानंतर एकाने त्याला पाणी पाजले आणि काही वेळाने त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यु झाला. याबाबत वृत्तसंस्थेला माहिती देताना अनवरचा भाऊ रियाझ म्हणाला, "त्याच्या मदतीला कोणीही आले नाही. सगळेजण फोटो काढण्यात आणि व्हिडिओ शूट करण्यात मग्न होते. त्यामुळे तेथे 15-20 मिनिटे वाया गेली. माझा भाऊ वाचू शकला असता.'

घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, "घटनास्थळी असलेल्या लोकांना धक्‍का बसला होता. अनवरला खूप जखमा झाल्या होत्या आणि प्रचंड रक्तस्राव होत होता. लोकांना त्याला कशा प्रकारे मदत करावी हे त्यांना समजत नव्हते.' तीन दिवसांपूर्वीच म्हैसूर येथेही असाच एक संवेदनशील प्रकार घडला होता. एका अपघातग्रस्त पोलिस अधिकाऱ्याला मदत करण्याऐवजी लोक फोटो काढण्यात मग्न होते.

Web Title: Lying In Blood, Karnataka Teen Cried For Help. They Filmed Him Instead