#Karunanidhi ...म्हणून करुणानिधी काळा चष्मा लावायचे!

वृत्तसंस्था
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

चेन्नईः दक्षिण भारताच्या राजकारणातील पितामह म्हणून ओळखले जाणारे एम. करुणानिधी यांचे मंगळवारी (ता. 7) रात्री निधन झाले. करुणानिधी म्हटले की काळा चष्मा, पांढऱ्या कपड्यांवर घेतलेली पिवळी शाल म्हणून डोळ्यासमोर येतात. पण, करुणानिधी गेल्या 50 वर्षांपासून चष्मा वापरत होते.

करुणानिधी चेन्नईला जात असताना त्यांच्या मोटारील 1968 मध्ये अपघाता झाला होता. अपघातामध्ये करुणानिधी यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली होती. उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी डॉक्टरांनी त्यांना चष्मा घालाण्याचा सल्ला दिला होता. पुढे काही दिवस ते काळा चष्मा लावूनच फिरत. पुढे मात्र मोठ्या फ्रेमचा काळा चष्मा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनला. पुढे-पुढे तर करुणानिधी अन् काळा चष्मा ही एक ओळखच निर्माण झाली होती. ते नेहमीच पांढरे कपडे आणि पिवळी शाल व काळा चष्मा वापरत.

गेल्या वर्षी मोठ्या फ्रेमच्या चष्म्याची फ्रेम बदलण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. त्यांनंतर फ्रेमचा शोध सुरू होता. अखेर जर्मनीमधून फ्रेम मागविण्यात आली. ती फ्रेम त्यांना आरामदायी वाटत होती.  तब्बल 46 वर्षानंतर चष्मा बदलला.
राजकारणातील दोन दिग्गज करुणानिधी व एमजीआर यांनी दक्ष‍िणेत काळा चष्मा घालण्याची फॅशन आणली.

Web Title: m karunanidhi always wear black glasses google