मॅकमास्टर यांची मोदींशी चर्चा

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

संरक्षण, दहशतवादविरोधी लढ्याबाबत ऊहापोह

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल एच. आर. मॅकमास्टर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये संरक्षण आणि दहशतवादविरोधी लढ्यातील सहकार्याबरोबरच प्रादेशिक सुरक्षिततेच्या मुद्याचाही समावेश होता. या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव एस. जयशंकरदेखील सहभागी झाले होते.

भारत अमेरिका रणनीतीक भागिदारीचे महत्त्व विशद करत मॅकमास्टर यांनी भारत हा संरक्षणक्षेत्रातील आमचा महत्त्वपूर्ण भागीदार देश असल्याचे नमूद केले. मोदी मॅकमास्टर चर्चेचा गोषवारा अमेरिकी दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात विस्ताराने मांडण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ होती. पुढील वर्षी नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्‍यता असल्याने या भेटीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे.

अफगाण, पाकशीही चर्चा
मॅकमास्टर यांनी भारताप्रमाणेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. पाकिस्तान भेटीमध्ये त्यांनी नागरी आणि लष्करी नेतृत्त्वाला सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्याचा सल्ला दिला होता. अफगाणिस्तान भेटीमध्ये त्यांनी पाकने लष्करी गटांना लक्ष्य करावे, यामध्ये भेदभाव केला जाऊ नये, असा उपदेशही केला होता. अफगाणिस्तानात आपले हितरक्षण करण्यासाठी पाकिस्तानने राजनैतिक संबंधांचा वापर करावा, असे सांगत त्यांनी कारस्थाने आणि हिंसाचाराचा आधार घेतला जाऊ नये, असेही म्हटले होते. दहशतवादग्रस्त दक्षिण आशियाई देशांना ट्रम्प प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याने भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Web Title: Macmaster talk of Modi