गोवाः मडगाव पालिकेेचे कचऱ्याचे ट्रक कुडतरीवासीयांनी अडवले

गोवाः मडगाव पालिकेेचे कचऱ्याचे ट्रक कुडतरीवासीयांनी अडवले

मडगाव - गोव्याची आर्थिक राजधानी असलेल्या मडगाव शहरातील सोनसोडो येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आठवड्यापुर्वी आग लागली आहे. ती आग अद्यापही धुसमसत आहे. या आगीमुळे धुराने लोट परिसरात पसरले असून या धुराने त्रस्त झालेल्या कुडतरीवासीयांनी आज सकाळी मडगाव पालिकेचे कचरावाहू ट्रक अडवले. सोनसोडो कचरा व्यवस्थापन प्रकल्पात प्रवेश करणाऱे तीन ट्रक सकाळी कुडतरीच्या ग्रामस्थांनी रोखून माघारी पाठवले. 

मडगाव शहरात दिवसाकाठी सुमारे 60 टन कचरा जमा होतो.  हा कचरा गोळा करून सोनसोडो येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या आवारात नेण्यात येतो. कचऱ्याचे ट्रक रोखल्यास कचरा गोळा करण्याची प्रक्रिया ठप्प होऊन मडगावात कचरा साचण्याची समस्या निर्माण होणार आहे.  

ओला व सुका कचरा वर्गीकरण करून न पाठवल्यास कचऱ्याचे ट्रक अडवण्यात येतील असा इशारा  सोनसोडो येथे रविवारी झालेल्या जाहीर सभेत देण्यात आला होता.  कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागलेली आग सात दिवसानंतरही आटोक्यात आणली जात नाही. एकूणच सोनसोडो येथील कचरा समस्येवर उपाययोजना करण्यात मडगाव पालिका व कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट मिळालेली फोमेंतो कंपनी अपयशी ठरल्याच्या निषेधात ही सभा घेण्यात आली होती. या सभेला कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लाॅरेन्स, जिल्हा  पंचायत सदस्य मोरेन रिबेलो, सरपंच रुई मिनेझीस या सभेत उपस्थित होते. 

आज सकाळी साडेसातच्या दरम्यान कुडतीवासीयांनी सोनसोडो येथे एकत्र येऊन कचऱ्याचे तीन ट्रक अडवले. सोनसोडो येथील कचऱ्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया होत नसल्याने कचऱ्याचा ढिगारा वाढत जातो व त्यामळे दुर्गंधी, जलप्रदुषण सारख्या समस्या निर्माण होतात. ही समस्या सोडवण्यात अपयश आल्यानेच आगीची दुर्घटना घडली अशी कुडतरी ग्रामस्थांचे मत आहे.   

सोनसोडो येथे गेल्या अनेक वर्षांपासून साठलेल्या दोन लाख टन कचऱ्याच्या ढिगाऱ्याला सोमवारी आग लागली होती. अग्नीशामक दलाने प्रयत्नाची शिक्सत करून सेच कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या ज्वालाग्राही मिथेन गॅस रोखण्यासाठी रेनझायम रसायनमिश्रीत पाण्याचा वापर करूनही आग आटोक्यात आली नाही. यासाठी मुंबई अग्नीशामक सेवा दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांच्या सल्ल्यानुसार आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मातीचा वापर सुरु करण्यात आला. शुक्रवार व शनिवारी चारशेपेक्षा जास्त ट्रक माती आग लागलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर ओतण्यात आली असून कचऱ्याच्या पृष्ठभागावर मातीचा धर रचण्यात येत आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत आग आटोक्यात आली आहे. धुराचे प्रमाणही बरेच कमी झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com