मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान यांच्या नेतृत्वाखाली गेली 15 वर्षे भाजपचे सरकार सत्तेवर आहे. 230 सदस्यांच्या या विधानसभेत बहुमतासाठी 116 जागा आवश्‍यक आहेत. 

भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान देत मैदानात उतरलेल्या काँग्रेसने मध्य प्रदेशात जोरदार टक्कर दिली असून, सकाळी नऊपर्यंत भाजप 30 आणि काँग्रेस 27 जागांवर आघाडीवर आहे.

मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान यांच्या नेतृत्वाखाली गेली 15 वर्षे भाजपचे सरकार सत्तेवर आहे. 230 सदस्यांच्या या विधानसभेत बहुमतासाठी 116 जागा आवश्‍यक आहेत. 

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजप-कॉंग्रेस यांच्यात काट्याची लढत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार निकालात पाहायला मिळत आहे. 

चाचण्यांचे कल असे : 
मध्य प्रदेश (जागा : 230 बहुमतासाठी : 116) 
भाजप कॉंग्रेस बसप अन्य 
रिपब्लिक टीव्ही-जन की बात 108-128 95-115 0 7 
टाइम्स नाऊ-सीएनएक्‍स 126 89 6 9 
इंडिया न्यूज एमपी-नेता 106 112 0 12 
इंडिया टुडे-ऍक्‍सिस माय इंडिया 102-120 104-122 1-3 3-8

Web Title: Madhya Pradesh assembly election BJP and Congress close fight