कमलनाथ म्हणाले, रस्त्यावर गाय दिसली नाही पाहिजे

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

कमलनाथ म्हणाले, की मध्य प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात लवकरात लवकर गोशाला उभारल्या पाहिजेत. याचा काँग्रेसच्या वचननाम्याशी काहीही संबंध नाही. गायींचे संगोपन ही माझी भावना आहे. मला गोमाता रस्त्यावर नाही दिसल्या पाहिजेत. 

भोपाळ : गोमाता (गाय) ही रस्त्यावर दिसली नाही पाहिजे. लवकरात लवकर गोशाळा उभारून करून गायींचे तेथे संगोपन केले पाहिजे, असे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले आहेत.

मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर कमलनाथ यांनी शपथ घेतली. देशभरात गायींवरून राजकारण सुरु असताना काँग्रेसनेही यामध्ये सहभाग घेतला आहे. गायींचे संगोपन करण्याचे आदेश मध्य प्रदेश सरकारने दिले आहेत. कमलनाथ यांनी नुकतेच अध्यात्म मंत्रालय स्थापन केले होते. छिंदवाडाच्या दौऱ्यावर आलेल्या कमलनाथ यांनी गाय रस्त्यावर दिसल्या नाही पाहिजेत असे म्हटले आहे.

कमलनाथ म्हणाले, की मध्य प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात लवकरात लवकर गोशाला उभारल्या पाहिजेत. याचा काँग्रेसच्या वचननाम्याशी काहीही संबंध नाही. गायींचे संगोपन ही माझी भावना आहे. मला गोमाता रस्त्यावर नाही दिसल्या पाहिजेत. 

Web Title: madhya pradesh bhopal kamal nath says i should not see cow on the streets