शपथ घेताच तासाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय

शपथ घेताच तासाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय

भोपाळ: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. यानंतर कमलनाथ यांनी हा निर्णय घेऊन हे आश्वासन पूर्ण केले आहे.

मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेताच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील फाईलवर स्वाक्षरी केली. कमलनाथ यांच्या निर्णयाचा लाभ 2 लाखांपर्यंतचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळेल. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. मुख्य सचिव बसंत प्रताप सिंग यांनी अर्थ आणि कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. सध्या राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावर 56,377 कोटी रुपयांचं कर्ज आहे. यातील जवळपास 12 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात गेलं आहे. 

दरम्यान, आज दुपारी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जांबुरी मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com