कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा मतदानादरम्यान मृत्यू

Madhya Pradesh Election Death of 3 Officers on Election Duty
Madhya Pradesh Election Death of 3 Officers on Election Duty

भोपाळ : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरु आहे. राज्यातील 230 जागांसाठी हे मतदान होत आहे. मात्र, कर्तव्य बजावत असताना इंदौर येथे दोन निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर गुना येथे एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. 

विधानसभेच्या 230 जागांसाठी आज सकाळपासून मतदान सुरु आहे. राज्यातील मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. मात्र, काही ठिकाणच्या मतदान केंद्रांवर इव्हीएममध्ये बिघाड झाल्याने संबंधित केंद्रांवरील मतदान प्रक्रिया काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, कर्तव्य बजावत असताना इंदौरमध्ये दोन निवडणूक अधिकाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली. त्यामुळे मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही मतदान प्रक्रिया पुन्हा सुरु झाली. त्यानंतर दीपिका बाल मंदिराच्या नेहरू नगरमधील निवडणूक अधिकारी कैलाश पटेल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

दरम्यान, येथील जिल्हाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गुना येथेही एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कामावरील ताण-तणावामुळेच पटेल यांना ह्रदयविकाराच झटका आल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com