MP By Election : मध्य प्रदेशात ज्योतिरादित्यांनी भाजपचा गड राखला; काँग्रेसला धक्का

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 10 November 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबत मंगळवारी देशातील 11 राज्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपने बाजी मारली असून जवळपास सहा राज्यात विजय मिळवला आहे.

भोपाळ - बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबत मंगळवारी देशातील 11 राज्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपने बाजी मारली असून जवळपास सहा राज्यात विजय मिळवला आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मध्य प्रदेशात तब्बल 19 जागा जिंकल्या आहेत. भाजपला राज्यात सत्ता कायम राखण्यासाठी 8 जागांची आवश्यकता होती. त्यांना दुप्पट जागा मिळाल्यानं जल्लोषाचं वातवरण आहे.

मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी २२ आमदारांसोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कमलनाथ सरकार कोसळले होते. त्यानंतर काँग्रेसच्या आणखी सहा आमदारांनी राजीनामे दिल्याने या सर्व २८ जागांवर पोटनिवडणूक झाली. विद्यमान सत्ताधारी भाजपला सत्ता टिकविण्यासाठी फक्त ८ जागांची आवश्यकता होती. परंतु जवळपास १९ जागा भाजपने जिंकल्या आहेत. अलिकडेच काँग्रेसमध्ये दिग्विजयसिंह गटाचे मानले जाणारे आणि अलिकडेच भाजपमध्ये येऊन मंत्रिपद मिळवलेले एदलसिंग कन्साना, ज्योतिरादित्य शिंदे गटाचे राज्यमंत्री गिरिराज दंडोतिया पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. काँग्रेसने ८ जागा राखून शिंदे गटाला धक्का देण्याचा प्रयत्न केला असला तरी, या निराशाजनक निकालामुळे नेतृत्वबदलाची मागणी पुढे येऊ शकते.

Live Updates:

मध्यप्रदेश - २८ जागा - भाजप १९, बसप १, काँग्रेस ८

- भाजपचा एका जागेवर विजय तर 19 जागांवर आघाडी; काँग्रेस 7 जागांवर पुढे

काँग्रेस नेते कमलनाथ यांनी पराभव स्वीकारला

-इंदौरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

-भाजप विजयाच्या समिप, 21 जागांवर आघाडी. काँग्रेस 6 तर बसपा 1 जागांवर पुढे

- भाजपाची विजयाकडे वाटचाल.

 -भाजपा 19, काँग्रेस 8 आणि बसपाची 1 जागांवर आघाडी

 -मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सहकाऱ्यासोबत मिठाई वाटप करून केला आनंद व्यक्त. 

-भाजपा 17, काँग्रेस 9 आणि बसपा 1 जागांवर आघाडी 

- 'काँग्रस EVM चा मुद्दा काढत आहेत, यावरून त्यांनी हार मानली आहे असं दिसतंय'- नरोथम मिश्रा, भाजप नेते

-बदनावर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे राजवर्धन सिंह जवळपास 17 हजार मतांनी आघाडीवर

-माझा मतदारांवर विश्वास, जनता खरं आणि खोट्यामधील फरक ओळखेल : कमलनाथ

-भाजपा 13 जागांवर तर काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर

-सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा 14 जागा तर काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर

-हाटपिपल्या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कमल सिंह पटेल 1668 मतांनी पुढे

- सुसवारा विधानसभा जागेवर आघाडीवर; नेपानगरमधून सुमित्रा कासडेकर आघाडीवर 

- 28 जागांसाठी ग्वालेरमधील केंद्रावर मतमोजणी सुरु

- पहिल्यांदा बॅलेट पेपरची मतमोजणी होणार

-भाजपाला फक्त 8 जागा जिंकाव्या लागणार आहेत. 

-काँग्रेसचं 'जय वीर हनुमान, करो कल्याण' कॅप्शनसह ट्विट

 

- मतमोजणीला सुरुवात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhya Pradesh By election live updates