Video : मेणबत्तीच्या प्रकाशात 35 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 

टीम ई-सकाळ
रविवार, 1 डिसेंबर 2019

मध्य प्रदेशातील सतना जिल्हाच्या मुख्यालयापासून 40 किलोमीटवर बिरसिंहपूर येथे एक आरोग्य केंद्र आहे. तेथे आयोजित एका वैद्यकीय शिबिरात 35 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

भोपाळ : मध्य प्रदेश आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा नमुना उघड झालाय. एक सरकारी रुग्णालयात मेणबत्ती आणि मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात 35 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्यानं संताप व्यक्त केलाय जातोय. अद्याप मध्य प्रदेश सरकारकडून या बाबत कोणतिही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एका वैद्यकीय अधिकाऱ्याने केवळ प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मीडियाला दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

नेमके काय घडले?
मध्य प्रदेशातील सतना जिल्हाच्या मुख्यालयापासून 40 किलोमीटवर बिरसिंहपूर येथे एक आरोग्य केंद्र आहे. तेथे आयोजित एका वैद्यकीय शिबिरात 35 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. संबंधित महिलांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, त्यांना सकाळी नऊ वाजता आरोग्य केंद्रात बोलवण्यात आलं. पण, डॉक्टर सायंकाळी पाच वाजता पोहोचले. त्यानंतर शस्त्रक्रियांना सुरुवात झाली. आरोग्य केंद्रात कॅम्पसाठी पुरेसे बेड, चादरींची सुविधा तर नव्हतीच. पण, विजेची सोयही नव्हती. वीज केली तर, जनरेटर चालवण्यासाठी तोही नादुरुस्त होता.

आणखी वाचा - कांद्यासाठी मिळतंय कर्ज, हेल्मेट घालून विक्री

लेखी स्पष्टीकरण मागितले?
आरोग्य केंद्रातील डॉक्टर नरेंद्र सिंह यांन सांगितले की, ऑपरेशन सुरू असताना तेथील वीज अचानक गेली. पण, ऑपरेशनच्या मशीनमध्ये वीज असते. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महिलांना टाके घालण्यासाठी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर नेण्यात आले. या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक अशोक अवधिया यांनी माहिती दिली असून, वीज केवळ 5 ते 7 मिनटेच गेली होती. पण, यासंदर्भात चौकशी सुरू आहे. आम्ही संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून लेखी स्पष्टीकरण मागितले आहे, असे अवधिया यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh family planning surgeries in government hospital