मध्यप्रदेशात साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

नर्मदानंद महाराज, हरिहरनंद महाराज, पंडित योगेंद्र महंत, कॉम्प्युटर बाबा आणि भय्यू महाराज अशा पाच साधूंना राज्यमंत्री बनवण्यात आले आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील पाच साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या या पाच साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भय्यू महाराजांसह इतर साधूंना हा दर्जा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकारच्या या निर्णयामुळे साधूंना मंत्री बनवून मुख्यमंत्र्यांनी आपले पाप धुतले आहेत, अशी खरमरीत टीका काँग्रेसने केली. 

नर्मदानंद महाराज, हरिहरनंद महाराज, पंडित योगेंद्र महंत, कॉम्प्युटर बाबा आणि भय्यू महाराज अशा पाच साधूंना राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. यासाठी मध्य प्रदेश सरकारने नर्मदा संवर्धन समिती नियुक्त केली असून, या समितीमध्ये पाच साधूंचा समावेश करण्यात आला आहे. या पाचही साधूंना राज्यमंत्रिपदाच्या दर्जासोबत या पदाशी संबंधित सर्व सुविधा मिळणार आहेत. दरम्यान, साधुंच्या राज्यमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना माध्यमांनी सवाल केला. मात्र, चौहान यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळले. 

Web Title: Madhya Pradesh Government gives MoS status to Sadhu Baba