कुत्र्यांची बदली होतेय, ऐकलंय का?

Dog Squad
Dog Squad

भोपाळ : सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे ही नित्याची बाब असते. मात्र मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारने पोलिसांच्या शोधपथकातील 46 श्‍वानांची बदली केली आहे. यावरून विरोधी पक्षांनी विशेषतः भाजपने सरकारवर कडाडून टीका केली आहे. 

सरकारच्या आदेशानुसार 23 व्या श्‍वान पथकातील पोलिस तपास अमली पदार्थांचा शोध घेणाऱ्या श्‍वानांची त्यांच्या प्रशिक्षकांसह वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली केली आहे. बदलीच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याची सूचना प्रशिक्षकांना देण्यात आली आहे. राज्यातील अधिकाऱ्यांच्या घाऊक पद्धतीने बदल्या केल्याने कमलनाथ सरकारवर विरोधकांनी टीका केली असताना श्‍वानांच्या बदल्यांवरून पुन्हा एकदा भाजपने सरकारला लक्ष्य केले आहे. अशा स्थितीत हा आदेश सरकारला अडचणीचा ठरू लागला आहे. 

"कमलनाथ सरकारने बदल्या करण्याचा सपाटा लावला असून श्‍वानांनाही सोडलेले नाही. त्यांच्याही बदल्या सरकारने केल्या आहेत,'' अशी टीका प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष विजेश लुणावत यांनी केली आहे. सरकारने काल पंचायत सचिवाच्या जागी सरपंचाची बदली करण्याचा आदेश दिला होता, त्यामुळे सरकारवर फजितीची वेळ आली होती. आता श्‍वानांच्या बदल्यांमुळे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. 

कमलनाथ सरकारने मनात आणले तर ते आकाशही विकतील. सरकारने श्‍वानांना तरी दावणीला लावयला नको. जर शक्‍य असेल आणि कोणी खरेदी करणारा मिळाला तर कमलनाथ सरकार जमीन आणि आकाशाचीही बदली करतील. 
- रामेश्‍वर शर्मा, भाजप आमदार, मध्य प्रदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com