मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

Sakal | Tuesday, 21 July 2020

 रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास 

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन (Madhya Pradesh Governor Lal ji Tandon) यांचे निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते त्यांचा मुलगा आशुतोष टंडन यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. प्रकृती खालावल्यानंतर  त्यांना लखनऊस्थित मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेचरवर ठेवण्यात आले होते. अखेर त्यांनी मंगळवारी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.