MP लव्ह जिहाद कायदा; 'घर वापसी' करणाऱ्यांसाठी खास तरतूद

madhya pradesh, love jihad law
madhya pradesh, love jihad law

भोपाळ : मध्य प्रदेश कॅबिनेटने नुकताच 'लव्ह जिहाद विरोधी विधेयक 'धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020' ( मप्र फ्रीडम ऑफ रिलीजन एक्ट 2020) ला मंजूरी देण्यात आली. या विधेयकामुळे महिला, अल्पवयीन मुली आणि  एससी-एसटी समाजातील लोकांना बळजबरीने धर्मांतर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणात 10 वर्षांच्या शिक्षेचे तरतूदीत असले तरी 'घर वापसी' करणाऱ्यांना कोणतीही शिक्षा करण्यात येणार नाही. याचा अर्थ पूर्वजांच्या धर्मात जाणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. 

विधेयकातील तरतुदीनुसार, 'स्व धर्मात पुन्हा येण्याला धर्मांतर मानले जाणार नाही. संबंधित व्यक्तीच्या जन्मावेळी जो त्याच्या पित्याचा धर्म असेल तो त्याचा धर्म असेल. हे विधेयक 28 डिसेंबरला प्रस्तावित विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. याचे कारणही मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. अपराधापेक्षा त्यांना चूक कळली ही गोष्ट महत्त्वाची मानली जाईल, असे ते म्हणाले. 

लग्नाच्या वाढदिवसाचं मोठं गिफ्ट; आपल्या 'हनी'साठी पठ्ठ्यानं 'मून'वर घेतला प्लॉट!

काय लव्ह जिहाद कायद्यातील तरतूद 

नव्या कायद्यात एकूण 19 तरतूदी आहेत. धर्मांतराच्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली तर पोलि त्यांच्यावर कारवाई करतील. जर एखाद्याने अल्पवयीन तसेच  अनुसूचित जाति/जमातीतील तरुणांनी फसवून धर्मांतर करायला लावल्याचा आरोप असेल तर संबंधित व्यक्तिला 2-10 वर्षांची शिक्षा केली जाऊ शकते. एखाद्याने धर्म लपवून पैसा आणि संपत्तीसाठी विवाह केला असेल तर तो विवाह नियम बाह्य ठरवला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com