Madhya Pradesh : म्हणून या गावात एक दिवस आधी साजरी झाली होळी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhya Pradesh : म्हणून या गावात एक दिवस आधी साजरी झाली होळी!

Madhya Pradesh : म्हणून या गावात एक दिवस आधी साजरी झाली होळी!

आज होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे.  आज तिथीनुसार लोक हा होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. पण, देशात असे एक गाव आहे जिथे होळी मुहूर्तावर साजरी केली जात नाही. जर, तिथे होळीच्या दिवशी होळी साजरी केली तर त्याचा वाईट परिणाम गावकऱ्यांना भोगावा लागतो.

मध्य प्रदेशातील मांडला आदिवासी भागात धनगाव हे गाव आहे. तिथे होळी एक दिवस आधी साजरी केली जाते. सगळा देश होळी पोर्णिमेला होळी साजरी करतो आणि इथे एक दिवस आधीच होळीची रात्र असते. लोक असे का करतात यामागेही एक गोष्ट आहे. ती कोणती जाणून घेऊयात.

मांडला जिल्ह्यातील धनगाव या गावातील होळीची कहाणी वेगळी आहे. कारण इथे एक दिवस आधी होळी खेळली जाते. होळी आली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतो. पण, अनेक वर्षांपासून धनगाव गावात होळीच्या आधीच होळी साजरी होते. यामागे अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, होळीच्या दिवशी येथे होळी साजरी केली. तर त्याचा वाईट परिणाम गावकऱ्यांना भोगावा लागतो.  गावात मृत्यू होतात. आर्थिक नुकसान होते. शेतातील पीकाची नासाडी होते. रोगराई पसरते.

या गावात केवळ होळीच नाही तर दिवाळीची सुरूवातही एक दिवस आधीच होते. धनगावची ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्नही दोनदा झाला. ज्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. त्यामुळे आता गावकरी एक दिवस आधीच होलिका दहन साजरे करतात.

गावकरी आधी देवळात खैरोमातेची पूजा करतात आणि नंतर होलिका दहन केलेल्या ठिकाणी जाऊन होळीच्या राखेने टिळक लावतात. यानंतर रंगांची आणि गुलालाची होळी सुरू होते.