'या' चार कारणांमुळे भैय्यूजी महाराज होते प्रसिद्ध

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

भैय्यूजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारकडून राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त झाला होता.

इंदूर : आधात्मिक गुरु भैय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. मध्य प्रदेशातील इंदूर येथील त्यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यादरम्यान त्यांचे निधन झाले. भैय्यूजी महाराज त्यांच्या चार कारणांमुळे अत्यंत प्रसिद्ध होते.

भैय्यूजी महाराजांचा जन्म मध्य प्रदेशातील शुजालपूर येथे झाला होता. त्यांचे नाव उदयसिंह देशमुख होते. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण करून मुंबईतील एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापनात नोकरी केली होती.  

त्यांचा ट्रस्ट करत होता अनेकांना मदत : 
भैय्यूजी महाराजांनी श्री. सदगुरु दत्त धार्मिक ट्रस्टची स्थापना केली होती. हा ट्रस्ट मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सक्रिय आहे. महाराष्ट्रातील बुलडाणाच्या खामगावमध्ये जरायाम पेशा जातीच्या पारध्यांच्या मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळा सुरु केली होती. या शाळेमध्ये 470 मुले शिक्षण घेत आहेत.

आलिशान कार आणि घड्याळांचे होते चाहते :
भैय्यूजी महाराज आध्यात्मिक गुरु होते. त्यांना आलिशान जीवन व्यतित करण्याची इच्छा होती. त्यांना आलिशान कार आणि घडाळ्यांची आवड होती. मात्र, त्यांच्या ट्रस्टकडे किती रक्कम आहे याबाबत त्यांनी कधीही स्पष्टीकरण दिले नाही. 

दुसरे लग्न आणि आरोप : 
भैय्यूजी महाराजांचे पहिले लग्न औरंगाबादच्या माधवी निंबाळकर यांच्याशी झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी काही वर्षानंतर दुसरे लग्न केले होते. दुसरे लग्नादरम्यान एका महिलेने त्यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांचे दुसरे लग्न चर्चेचा विषय ठरले होते. 

विलासराव देशमुख यांच्याशी जवळीक :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांनी दोघांना एकत्ररित्या राजकारणाचे धडे घेतले.  2002 मध्ये जेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. तेव्हा अनेकदा भैय्यूजी महाराज महाराष्ट्रात येत होते. त्यांना प्रमुख पाहुण्यांचा दर्जा म्हणूनही देण्यात आला होता. 

महाराष्ट्रातील नेत्यांशी त्यांचे घनिष्ट संबंध होते.  त्यांनी दिल्लीत झालेल्या अण्णा हजारेंच्या उपोषणादरम्यान त्यांनी अण्णा हजारेंसोबत मध्यस्थी केली होती. त्यानंतर अण्णा हजारेंनी त्यांचे उपोषण सोडले होते.  

राज्यमंत्रिपदाचा दर्जा सोडला :
मध्य प्रदेशच्या शिवराज सरकारच्या वतीने ज्या पाच संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. त्यापैकी भैय्यूजी महाराज एक होते. मात्र, त्यांनी हे पद स्वीकार केला नाही.  

Web Title: madhya pradesh indore bhayyuji maharaj shoot himself