स्कूल व्हॅनमध्ये गुदमरून 6 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

''शाळा प्रशासनाने माझ्या मुलाची हत्या केली. त्यांनी माझ्या मुलाला व्हॅनमध्ये चार तासांपर्यंत सोडले. त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला'',.

- नैतिकचे वडिल

भोपाळ : एका सहा वर्षीय विद्यार्थ्याचा स्कूल व्हॅनमध्ये गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. व्हॅनचे दरवाजे बंद झाल्याने ते उघडता न आल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशातील होशांगाबाद जिल्ह्यात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

School van india

नैतिक या सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. हा डोलारिया टाऊन येथील साई इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. नैतिकला घटनेच्या दुसऱ्या दिवशी बेशुद्धावस्थेत भोपाळ रुग्णालयात आणण्यात आले. याबाबत त्याच्या वडिलांनी सांगितले, की ''शाळा प्रशासनाने माझ्या मुलाची हत्या केली. त्यांनी माझ्या मुलाला व्हॅनमध्ये चार तासांपर्यंत सोडले. त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला'', असे नैतिकच्या वडिलांनी सांगितले.

School van india

''नैतिक स्कूल व्हॅनमध्ये अडकला गेला. याबाबतची कोणतीही माहिती स्कूल व्हॅन अटेंडंटला नव्हती. स्कूल व्हॅनची अटेंडंट महिला व्हॅनमधील सर्वांना बऱ्याचदा वर्गात सोडत असे. मात्र, त्यादिवशी व्हॅनच्या अटेंडंटला नैतिकला व्हॅनमधून बाहेर आणण्यास विसर पडला. त्यामुळे नैतिक मृत्यू झाला'', अशी माहिती शाळेचे व्यवस्थापक नितीन गौर यांनी दिली. 

Web Title: Madhya Pradesh News Forgotten locked in school car for hours 6 year old boy dies