esakal | मुलीला वाचवताना 25 ते 30 लोक पडले विहिरीत; 4 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

MP

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील गंजबासोदामध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. विहिरीत पडलेल्या एका लहान मुलीला वाचवण्यासाठी काठेवर उभे राहिलेले 25 ते 30 लोक विहिरीत पडले आहेत.

मुलीला वाचवताना 25 ते 30 लोक पडले विहिरीत; 4 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

भोपाळ- मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील गंजबासोदामध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. विहिरीत पडलेल्या एका लहान मुलीला वाचवण्यासाठी काठेवर उभे राहिलेले 25 ते 30 लोक विहिरीत पडले आहेत. जमीन खचल्याने लोक विहीरत पडल्याचं सांगण्यात येतय. यात 4 लोकांना मृत्यू झाला आहे, तर 16 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मदतकार्य घटनास्थळी सुरु आहे. असे असले तरी नक्की किती लोक मातीखाली दबलेत हे अद्याप कळू शकलेलं नाही. विहीर 50 फूट खोल होती आणि यात 20 फूटापर्यंत पाणी होतं. (Madhya Pradesh people fall into a well in Ganjbasoda area in Vidisha)

विहिरीच्या कडेला उभे राहून पाहणारे लोक 25-30 लोक पडले

एका लहान मुलीला वाचवत असताना ही घटना घडली. मुलीला वाचवण्यासाठी काही लोक विहिरीत उतरले होते. 40 ते 50 लोक मदतीसाठी आणि पाहण्यासाठी विहिरीच्या कडेला उभे होते. यादरम्यान, विहिरीचे छत कोसळले, ज्यामुळे 25 ते 30 लोक विहिरीत पडले. यातील जवळपास 16 लोकांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. विहिरीवरचे छत कमकुवत झाले होते, त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

रात्री 11 वाजल्यापासून मदत कार्य सुरु आहे. त्यातच मदतकार्यासाठी आलेले एक ट्रॅक्टरही विहिरीत पडले आहे, ज्यामुळे चार पोलीस आणि काही लोक विहिरीत पडलेत. तीन पोलिसांना बाहेर काढण्यात आलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ मदतकार्य देण्याचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पोहोचली आहे. शिवाय मदतकार्यासाठी आवश्यक उपकरणे घटनास्थळी आणण्यात आले आहेत. मुख्यमंत्री स्वत: या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत आणि जखमींना 50 हजारांची मदत घोषित करण्यात आली आहे.

loading image