'डेल्टा प्लस'ची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू

corona
corona
Summary

देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस या नव्या कोरोना अवताराने भीती वाढवली आहे. देशाभरात डेल्टा प्लस या म्युटेन्टचे रुग्ण आढळत आहेत.

भोपाळ- देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस या नव्या कोरोना अवताराने भीती वाढवली आहे. देशाभरात डेल्टा प्लस या म्युटेन्टचे रुग्ण आढळत आहेत. त्यातच मध्य प्रदेशातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. उज्जैनमध्ये या विषाणूची बाधा झालेल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या पतीने कोरोनाप्रतिबंधक लस घेतली होती, तो मात्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत डेल्टा प्लसचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. (Madhya Pradesh records first death from Delta Plus variant of Covid19)

कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर या महिलेच्या जिनोम सिक्वेंसिंगसाठी सॅम्पल घेण्यात आला होता. त्यानंतर या महिलेला कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची बाधा झाल्याचे समोर आले. डेल्टा व्हेरियंटचा हा पहिलाच मृत्यू असल्याने चिंता वाढली आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत ५ डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यातील दोन रुग्ण भोपाळमधील आहेत, तर उर्वरित रुग्ण उज्जैनमध्ये आढळून आले आहेत. शिवाय राज्यातील डेल्या प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

corona
कोवॅक्सिन दोन वर्षांच्या मुलांवर काम करणार का?

उज्जैनचे नोडल अधिकारी डॉ. रौनक यांनी इंडिया टूडेला माहिती देताना सांगितलं की, 'डेल्टा प्लस व्हेरियंटची बाधा झाल्याने एका २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली होती. पतीने कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले होते. तो विषाणूतून बरा झाला आहे. पण, महिलेने लशीचा एकही डोस घेतला नव्हता.'

corona
नव्या IT नियमांविरोधात 13 न्यूज संस्थांची हायकोर्टात धाव

मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, 'सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. डेल्टा प्लसने बाधित झालेल्या रुग्णांची कॉन्टक्ट ट्रेसिंग करण्यात आली आहे. राज्यातील सर्व रुग्णालयांना खबरदारी घेण्यास सांगण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ कोरोना रुग्णांची, विषेश करुन डेल्टा प्लस व्हेरियंटने प्रभावित झालेल्या लोकांची ओळख पटवता येईल.' सारंग पुढे म्हणाले की, 'डेल्टा प्लसच्या पाच रुग्णांपैकी चार जणांनी कोरोनाची लस घेतली होती. ते आता बरे झाले आहेत. पण, लस न घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com