हॉस्पिटलमध्ये आजारी महिलेवर वॉर्ड बॉयने केला बलात्कार

डायलासिससाठी रुग्णालयात दाखल झाली होती. कपडे बदलण्याची खोली दाखवण्याच्या बहाण्याने आरोपी तिला एका निर्जन खोलीत घेऊन गेला.
rape case
rape case File photo

इंदूर: रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिलेने वॉर्ड बॉयवर (Ward Boy) बलात्काराचा आरोप केला आहे. वॉर्ड बॉयने आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये (Indore) सरकारी रुग्णालयात (govt Hospital) २८ जुलै रोजी ही घटना घडली. आरोपी ३२ वर्षांचा असून सोमवारी रात्री या प्रकरणात FIR दाखल झाला. आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडित महिला धार जिल्ह्यात राहते. ती २८ जुलैला डायलासिससाठी रुग्णालयात दाखल झाली होती. कपडे बदलण्याची खोली दाखवण्याच्या बहाण्याने आरोपी तिला एका निर्जन खोलीत घेऊन गेला. तिथे त्याने बलात्काराचा गुन्हा केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला सामाजिक बदनामीची भीती दाखवली व खासगी वॉर्डमध्ये दोन दिवसांसाठी अ‍ॅडमिट केले.

rape case
मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारतो - आचार्य तुषार

त्यानंतर वॉर्ड बॉयने तिला १ हजार रुपये दिले व घरी पाठवून दिले, असे अधिकाऱ्याने सांगितले. दोन दिवसानंतर पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्कार) तक्रार नोंदवली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com