दिनकरन यांचा 25 कोटींचा दंड कायम

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

दिनकरन हे सध्या शशिकला यांचे निकटवर्तीय मानले जातात.

1991 ते 96 या काळात तमिळनाडूत जयललिता सत्तेवर असताना, त्या वेळी अण्णा द्रमुकचे राज्यसभेतील खासदार असलेल्या दिनकरन यांनी त्यांच्या बॅंक खात्यात प्रचंड रक्कम जमा केली होती. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशी करून त्यांना आर्थिक अफरातफरीच्या आरोपावरून 25 कोटींचा दंड ठोठावला होता

 

चेन्नई - मद्रास उच्च न्यायालयाने आज अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांचे पुतणे टीटीव्ही दिनकरन यांना ठोठावण्यात आलेला 25 कोटींचा दंड कायम केला. फेरा कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने दिनकरन यांनी वीस वर्षांपूर्वी हा दंड ठोठावला होता. दिनकरन हे सध्या शशिकला यांचे निकटवर्तीय मानले जातात.

1991 ते 96 या काळात तमिळनाडूत जयललिता सत्तेवर असताना, त्या वेळी अण्णा द्रमुकचे राज्यसभेतील खासदार असलेल्या दिनकरन यांनी त्यांच्या बॅंक खात्यात प्रचंड रक्कम जमा केली होती. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशी करून त्यांना आर्थिक अफरातफरीच्या आरोपावरून 25 कोटींचा दंड ठोठावला होता. आपण सिंगापूरचे नागरिक असल्याने सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकार कक्षेत येत नसल्याचा दावा करीत दिनकरन यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणी उच्च न्यायालायाने आज हा निर्णय देत दंड कायम ठेवला.

Web Title: Madras HC confirms Rs 25 crore penalty on AIADMK MP Sasikala’s nephew