जयललिता यांच्या मृत्युबद्दल न्यायाधीशांनाही संशय

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

चेन्नई- तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनाबद्दल मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी संशय व्यक्त केला आहे. जयललितांचे शव उकरून काढण्याचे आदेश का देऊ नयेत, असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला आहे. 

जयललितांच्या निधनाबद्दल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, त्याची सुनावणी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वैद्यलिंगम यांनी घेतली. 

जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूवर शोककळा पसरल्यावर त्यांच्या मृत्युबद्दल कार्यकर्ते संशय व्यक्त करीत होते. तसेच, त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भावुक होत दुखावेगात मृत्युला कवटाळल्याचे समोर आले होते. माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या निधनामुळे तमिळनाडूत आतापर्यंत 597 जणांचा मृत्यू झाल्याचे पक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निधनात म्हटले होते. 
 
Web Title: madras hc justice expresses doubt over jayalalitha's death