अयोध्यापतींचे भव्यदिव्य मंदिर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

अयोध्येत उभारले जाणारे राममंदिर हे सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे, जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असे बिरुद मिरवणाऱ्या या वास्तूची रचना देखील खूप वेगळी आणि नावीन्यपूर्ण असेल. श्री. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंदिराच्या सुधारित आराखड्याला नुकतीच मान्यता दिली असून मंदिराच्या मूळ आराखड्याचा विस्तार करत त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

अयोध्येत उभारले जाणारे राममंदिर हे सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे, जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असे बिरुद मिरवणाऱ्या या वास्तूची रचना देखील खूप वेगळी आणि नावीन्यपूर्ण असेल. श्री. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंदिराच्या सुधारित आराखड्याला नुकतीच मान्यता दिली असून मंदिराच्या मूळ आराखड्याचा विस्तार करत त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महादेवाचे पूजन
राममंदिराच्या वास्तूचा मूळ आराखडा हा विहिंपने तयार केलेला आहे, ११९२ मध्ये त्याची निर्मिती करण्यात आली होती.  मंदिराच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ४० टक्के दगडांचे कोरीव काम हे पूर्ण झाले. कुबेर टिला मंदिरामध्ये रुद्राभिषेकानंतर मंदिराच्या उभारणीच्या कार्यक्रमांना सुरवात झाली. परंपरेप्रमाणे आधी महादेवाचे पूजन करूनच पुढील विधींना प्रारंभ करण्यात आला.

Image may contain: outdoor, text that says "१००-१२० एकर मंदिराचा परिसर ७६ ते ८૪ हजार चौ. फूट परिसरात मंदिराची उभारणी २७० ते २८० फूट मंदिराची रंदी २८० ते ३०० फूट मंदिराची लांबी गर्भगृहाच्या आधी आधी तीन स्थाने १) भजन- कीर्तन स्थान ध्यानस्थळ रामलल्लाचे दर्शन ३१८ मंदिरातील एकूण खांब १६१ फूट प्रस्तावित उंची"

काही कोटींचा खर्च
उभारणीसाठी काहीशे कोटी रुपये खर्च केले जाण्याची शक्यता आहे. मंदिराच्या ट्रस्टला आत्तापर्यंत पंधरा कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. रामजन्मभूमी न्यासला आत्तापर्यंत केवळ पाच कोटी रुपये एवढाच निधी गोळा करता आला आहे.  मंदिर ट्रस्टकडून खर्चाचा अधिकृत ताळेबंद सादर करण्यात आलेला नाही.

पंधरा पिढ्या अन् १३१ मंदिरे
अहमदाबाद : अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाने नवीन अध्याय सुरू होईल. बऱ्याच वर्षांनंतर भूमिपूजनाचा दिवस उजाडला आहे. हा दिवस पाहण्यासाठी अहमदाबादचे एक कुटुंब खूपच उत्साही आहे. हे कुटुंब दुसरे तिसरे नसून राम मंदिराच्या रचनेशी निगडीत असणारे सोमपुरा कुटुंब आहे. अहमदाबाद येथील हे कुटुंब पंधरा पिढ्यांपासून मंदिरांची रचना आणि आखणी करत आहे. आतापर्यंत त्यांनी १३१ मंदिरांची रचना तयार केल्याचे सोमपुरा कुटुंबांचे म्हणणे आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अयोध्येत राम मंदिराच्या रचनेवर सर्वात अगोदर काम सोमपुरा कुटुंबाने केले आहे. चंद्रकांत सोमपुरा यांनी १९९० च्या दशकातच मंदिरावर काम सुरू केले होते. चंद्रकांत आता ७७ वर्षांचे आहेत. मंदिर रचनांची परंपरा आता त्यांचे दोन मुले निखिल (वय ५५) आणि आशिष (वय ४९) पुढे चालवत आहेत. निखिल यांच्या मते, पुढची पिढी देखील आता या कामात जोडली गेली आहे. ते म्हणतात, सोमनाथ मंदिराची पुनर्रचना त्यांचे आजोबा प्रभाशंकर सोमपुरा यांनी केली होती. एवढेच नाही तर पद्मश्रीने सन्मानित असलेले प्रभाशंकर सोमपुरा यांनी शिल्पशास्त्रवर चौदा पुस्तके लिहली.

घटनाक्रम - बाबरी मशीद ते राममंदिर

  • १५२८-२९ अयोध्येतील वादग्रस्त जागेवर बाबरी मशिदीची उभारणी. 
  • १८८५ महंत रघुवीर दास यांनी वाद न्यायालयात नेला. 
  • २०१० वादग्रस्त जागेचे अलाहाबाद न्यायालयाकडून त्रिभाजन
  • २०१७ अडवानी, मुरली मनोहर जोशी, उमा भारतींसह अनेक नेत्यांवरील फौजदारी आरोप पुन्हा लावण्यास अनुमती.
  • २०१८ अयोध्येतील जमिनीच्या वादावरील सुनावणीत मशीद हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असा निर्णय १९९४ मध्ये न्यायालयाने दिला होता. त्याचे पुनरावलोकन करण्यासाठी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हा मुद्दा देण्यास नकार.
  • २०१९ सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्येतील २.७७ एकर जागा रामलल्ला यांना देत आहे, असा निवाडा केला. त्याचवेळी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा चांगल्या ठिकाणी द्यावी, अशीही सूचना केली. 
  • २०२० मंदिर उभारणीसाठी श्रीरामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभेत घोषणा. धानीपूर येथील पाच एकर जागा स्वीकारण्याचा उत्तर प्रदेश सुन्नी मध्यवर्ती वक्फ बोर्डाचा निर्णय.
  • Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The magnificent temple of shri ram