सोशल मीडियावर #हर_हर_महादेवचा गजर ट्रेंडिंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

- श्रावण महिन्याला आताच सुरवात झाली आहे. आणि श्रावण महिना म्हटला की शंकराच्या पुजेला एक विशेष असे महत्व येते.

श्रावण महिन्याला आताच सुरवात होईल. श्रावण महिना म्हटलं की शंकराच्या पुजेला एक विशेष असे महत्व येते. त्यासोबत श्रावणात नागपंचमी, राखीपौर्णिमा ते दहीहंडीपर्यंत अनेक सण येतात. घरात जिवत्यांचे चित्र, त्यामध्ये हिरण्यकश्यपूला मारणाऱ्या नरसिंहाचे चित्रही, श्रावणी सोमवारचे उपास, आघाडा, दुर्वा, फुलं, आणि महादेवाचा होणारा अभिषेक अशा अनेक गोष्टी यासोबत आल्याच.

शिवभक्त मोठ्या प्रमाणात असल्याने उत्तर भारतात दर सोमवारी शंकराची मोठी पूजा केली जाते. श्रावण महिन्यात लोक महादेवाची पुजा करत असतात. महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत असतात. असाच श्रावण पूजेचा उत्साह उत्तर भारतात बघायला मिळतो आहे.

श्रावणाच्या निमित्ताने ट्विटरवरही #हर_हर_महादेव हा ट्रेंड सुरू झालाय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahadev worships start with Shravan trending on social media

टॅग्स