महाकौशल एक्सप्रेस रुळावरून घसरली; 12 जखमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर
दिल्ली : 011 23341072 / 74 
झांशी : 0510-1072
ग्वाल्हेर : 0751-1072
बांदा : 05192-1072

लखनौ : रेल्वेच्या महाकौशल एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याने किमान बाराजण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील कुलपहार ते महोबा यादरम्यानच्या रेल्वे मार्गावर आज (गुरुवार) पहाटे हा अपघात घडला. 

महाकौशल एक्सप्रेस ही जबलपूर ते नवी दिल्ली दरम्यान धावते. या गाडीचे चार वातानुकुलित, एक शयनयान (स्लीपर), दोन सामान्य (जनरल) वर्गाचे आणि एक मालडबा पहाटे अडीच वाजता घसरले. 

महोबा स्थानक सोडल्यानंतर काही मिनिटांतच ही गाडी रुळावरून घसरली. या स्थानकापासून अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर घडला तेव्हा रेल्वे गाडीने जास्त वेग घेतलेला नव्हता. आणखी पुढे जाऊन ती घसरली असती तर अधिक वेगामुळे भीषण अपघात झाला असता. 
आपत्तीकालीन मदत रेल्वे त्वरीत घटनास्थळी पोचली, आणि जखमी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

रेल्वे पोलिस आणि अधिकारी घटनास्थळी पोचले असून, मदतकार्य सुरू आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी खालील हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहेत. 
दिल्ली : 011 23341072 / 74 
झांशी : 0510-1072
ग्वाल्हेर : 0751-1072
बांदा : 05192-1072

Web Title: Mahakoshal express derails, many people injured