श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती खालावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahant Nritya Gopal Dass health deteriorated

श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती खालावली

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास (८४) यांची (Mahant Nritya Gopal Das) प्रकृती रविवारी (ता. २४) पुन्हा खालावली (health deteriorated). यामुळे त्यांना लखनौच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महंत नृत्य गोपाल दास हे किडणीच्या संसर्गाने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना रविवारी अयोध्येहून डॉक्टरांच्या देखरेखीखाली लखनौला नियमित तपासणीसाठी आणण्यात आले. (Mahant Nritya Gopal Dass health deteriorated)

दोन वर्षांपूर्वी कृष्ण जन्मभूमी मथुरा येथे कृष्ण जयंतीच्या वेळी कोरोनाची लागण झाल्यापासून महंत नृत्य गोपाल दास हे सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतात. ट्रस्टचे अध्यक्ष पूज्य महंत नृत्य गोपाल दास जी महाराज यांना लखनौच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किडणीला संसर्ग झाल्याच्या शक्यतेमुळे त्यांना दाखल केले आहे, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.

हेही वाचा: नायजेरियातील बेकायदेशीर तेल कारखान्यात स्फोट; १०० हून अधिक ठार

महाराजांना कधीकधी लघवीचा त्रास होतो. तसेच तपासणीसाठी रुग्णालयात आणले आहे. किडणीला संसर्ग नाही. तो निरोगी आहे, असे महंत कमलनयन दास यांनी सांगितले. याआधी ३ ऑक्टोबर २०२१ रोजी महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती अचानक बिघडली (health deteriorated) होती. मेदांता हॉस्पिटलचे संचालक राकेश कपूर तपासणी करण्यासाठी अयोध्येत पोहोचले होते. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महंत यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले.

महंत नृत्य गोपाल दास (Mahant Nritya Gopal Das) यांचा जन्म १९३८ मध्ये मथुरा येथील बरसाना येथील कहोला गावात झाला. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि मथुरेहून अयोध्येला आले. १९५३ मध्ये त्यांनी अयोध्येतील मणिराम दास छावणी येथे राम मनोहर दास यांच्याकडून दीक्षा घेतली. ते रामजन्मभूमी (Ram Janmabhoomi) न्यास सोबत कृष्णजन्म भूमी न्यासचे अध्यक्ष देखील आहेत.

Web Title: Mahant Nritya Gopal Dass Health Deteriorated Ayodhyaram Janmabhoomi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ayodhya Ram MandirAyodhya
go to top