esakal | महाराष्ट्र,आंध्रातील रुग्णांना तेलंगणमध्ये ‘नो एंट्री’
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

महाराष्ट्र,आंध्रातील रुग्णांना तेलंगणमध्ये ‘नो एंट्री’

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

हैदराबाद - कोरोनाचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी तेलंगण (Telangana) पोलिसांकडून (Police) महाराष्ट्र (Maharashtra) आणि आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) येणाऱ्या रुग्णवाहिकांना (Ambulance) सीमेवर (Border) रोखले (Stop) जात आहे. दोन्ही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून चांगल्या उपचारासाठी (Treatment) अनेक रुग्ण (Patient) हैदराबादकडे येत आहेत. (Maharashtra, Andhra patients get no entry in Telangana)

मात्र, पोलिसांकडून सूर्यपेट जिल्ह्यातील कोदाद मंडळांतर्गत रामापूरम येथे आणि कर्नुलच्या पुल्लुर टोल नाक्यावर रुग्णवाहिका अडवण्यात येत आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेश पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रुग्णालयाच्या परवानगीनंतरच आंध्रातील रुग्णवाहिकांना हैदराबादेत सोडण्यात येत आहे.

कोरोनामुळे हैदराबादमध्ये रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेड उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. आरोग्य सेवेवरील वाढता ताण पाहून पोलिसांकडून आंध्र प्रदेशातील रुग्णांना हैदराबादेत आणण्यास मनाई केली जात आहे.