सीमा प्रश्नी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे मुंबईत उपोषण

मिलिंद देसाई
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

बेळगाव / मुंबई - बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत आज मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र एकीकरण युवा समितिचे उपोषण सुरू झाले आहे. बेळगावसह सीमा भागातून कार्यकर्ते उपोषणासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

 बेळगावचे बेळगावी करणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणांनी आझाद मैदान परिसर आंदोलन कर्त्यांनी दणाणून सोडला आहे. युवा समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या  उपोषणाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचे लक्ष सीमाप्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्यांकडे वेधण्यात येणार आहे.

युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, सचिव श्रीकांत कदम, अमित देसाई, कुलदीप पाटील, तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, माजी महापौर सरिता पाटील, जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, धनंजय पाटील, बाबू पावशे, ग्राम पंचायत सदस्य राजू पावले, सतीश कुगजी, चेतक कांबळे, यल्लप्पा पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषणस्थळी दाखल झाले आहेत.

उपोषणाला सुरवात करण्यापूर्वी हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, चंदू पाटील, यतेश हेब्बाळकर आदींनी अभिवादन केले.

Web Title: Maharashtra Ekikaran Samiti agitation in Mumbai