महाराष्ट्र एकीकरण समितीचा उद्या महामेळावा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

बेळगाव - कर्नाटक विधिमंडळ अधिवेशन बेळगावात घेऊन सीमा भागातील मराठी माणसांना खिजवण्याचा आणि सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी (ता. १०) महामेळाव्याचे आयोजन केले आहे.

या वेळी महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगावात विधिमंडळ अधिवेशन घेण्याचा सपाटा लावला. दरवर्षी हिवाळी अधिवेशन बेळगावात घेण्याचा घाट घातला जातो. यंदाही सोमवारपासून (ता. १०) विधिमंडळाचे अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून महामेळावा आयोजित केला आहे. दरवर्षी परवानगीवरून जिल्हा प्रशासन म. ए. समिती नेत्यांना वेठीस धरते. पण, समिती नेत्यांनी प्रशासनाकडे परवानगीच मागितली नाही. त्यामुळे गोंधळलेल्या प्रशासनाने स्वत:हून परवानगी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

सीमावासीयांवरील अन्याय दर्शविण्यासाठी, कर्नाटकच्या अधिवेशनाविरोधात आवाज उठविण्यासाठी आणि आपला मराठी बाणा दाखविण्यासाठी आम्ही महामेळाव्याचे आयोजन करत आहोत. सर्व सीमावासीयांनीही आपली ताकद दाखवून देणे गरजेचे आहे.
- मनोहर किणेकर,
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र एकीकरण समिती

Web Title: maharashtra ekikaran samiti conference in Belgaum