वाढीव वीज बिल आलंय? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे महत्त्वाची!

मंगळवार, 30 जून 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यादरम्यान सर्वच व्यवहार बंद होते.

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने या नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता वीज बिल देयक भरण्यासाठी हफ्त्याची सुविधा देऊ केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात जर दुप्पट वीज बिल आले असेल तर अशा ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी हफ्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यादरम्यान सर्वच व्यवहार बंद होते. सर्वच बाबी बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात असताना देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये वीज कंपन्यांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. मागील तीन महिन्यांपासून वीज बिल न पाठविणाऱ्या वीज कंपन्यांनी जास्त बिल पाठविले होते. इतकेच नाही तर ज्या लोकांनी लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन बिल देयक भरले त्यांनाही मागील 3 महिन्यांचे बिल देण्यात आले. 

या कंपन्या करते वीज पुरवठा

मुंबईत चार कंपन्या आहेत ज्या वीज पुरवठा करत आहे. यामध्ये MSEDCL, BEST, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) आणि Tata Power Company (TPC) कंपनीचा समावेश आहे. वीज बिलात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनने मुंबईमध्ये वीज पुरवठा कंपनीसोबत बैठक घेतली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा