पोलिसांची कारवाई लोकशाहीसाठी घातक, वरुण गांधींची ठाकरे सरकारवर टीका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी समित ठक्करने अपशब्दांचा वापर करत टि्वट केले होते.

नवी दिल्ली- भाजप नेते वरुण गांधी यांनी महाराष्ट्र सरकारने समित ठक्करवर केलेली कारवाई ही लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा आरोप केला आहे. ठाकरे सरकारने कारवाईसाठी उचलले पाऊल देशातील लोकशाहीसाठी घातक असल्याचे ते म्हणाले. समित ठक्करने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पूत्र तथा कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका करणारे टि्वट केले होते. याप्रकरणी समित ठक्करला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. 

सुरुवातीला त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर ती 2 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. महाराष्ट्र सरकारच्या या कारवाईवर वरुण गांधी यांनी नाराजी जाहीर केली आहे. देशाच्या लोकशाहीसाठी हे घातक आहे. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. सरकार कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही. 

दरम्यान, समित ठक्करचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये पोलिस त्याला डोळ्यावर पट्टी आणि बेड्या बांधून घेऊन जाताना दिसत आहेत. यावर समितच्या भावाने तो दहशतवादी आहे का, असा सवाल केला आहे. हे मानवाधिकाराचे उल्लंघन असल्याचेही तो म्हणाला आहे. 

हेही वाचा-  काँग्रेसने आता माफी मागावी; प्रकाश जावडेकर यांचा राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी समित ठक्करने अपशब्दांचा वापर करत टि्वट केले होते. त्यानंतर त्याला 24 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे समित ठक्करला पंतप्रधान मोदी हेही फॉलो करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra govts action against Sameet Thakkar dangerous for democracy says Varun Gandhi