
आज देशात अन् राज्यात काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? वाचा एका क्लिकवर
Raigad : खोपोलीत ४८ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली, अनेक विद्यार्थी जखमी
रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलिस स्टेशन परिसरात ४८ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताच अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुण्यात विमाननगर, चंदननगर परिसरात अवकाळी पाऊस
आज पुण्यात विमाननगर, चंदननगर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच जांभूळवाडी-आंबेगाव परिसरात देखील पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली आहे. पुणेतील ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली, आज उरुळी कांचन, लोणी काळभोर परिसरातही पाऊस झाला.
दलाई लामांकडून सुक्खूंचे अभिनंदन; म्हणाले, मी अनेकदा...
तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी सुखविंदर सिंग सुक्खू यांचे हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. "62 वर्षांहून अधिक काळ भारत हे माझे घर आहे आणि धर्मशाला येथे राहणे माझ्यासाठी सुखद राहिले आहे. परिणामी, मी अनेकदा मुख्यमंत्र्यांना 'आमचे मुख्यमंत्री' असे संबोधतो" असे त्यांनी म्हटले आहे.
PM मोदींच्या हस्ते गोव्यात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे उद्घाटन केले.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मोर्चा
पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर काल शाई फेकल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर आज भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हे आंदोनल करण्यात आलं.
चंद्रकांत पाटलांच्या कपाळावर 'भिकारी' लिहून पुण्यात बॅनरबाजी
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र या बॅनरवर एका अज्ञात व्यक्तीकडून चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेच्या कपाळावर 'भिकारी' असं लिहिलं आहे. यावरून आता पुण्यात नवा वाद रंगताना पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणाची सुरवात मराठीतून म्हणाले, 'टेकडीच्या गणपतीला...'
पंतप्रधान मोदींच्या भाषणाची सुरवात मराठीतून केली आहे. ते म्हणाले टेकडीच्या गणपतीला माझं वंदन. आज संकष्टी चतुर्थी आहे. या विकास कामांचं उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. या महामार्गामुळे रोजगार मिळेल. तर उद्घाटनामुळे आरोग्य मिळेल, त्याचबरोबर सगळीकडे मेडिकल कॉलेज असतील. त्याचबरोबर देशभरातील प्रार्थना स्थळांचा विकास होतो आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळे काम जलद गतीने होत आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनेक प्रकल्पाचं लोकार्पण
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनेक प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. यामध्ये नागनदीचा कायापालट करणे, नवनवीन तंत्रज्ञान आणि सुविधा असणारे हॉस्पिटल अशा अनेक प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं आहे.
प्रकल्प होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आजचा दिवस आनंदाचा आहे. या मार्गाला आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे. अनेक लोकांनी प्रकल्प होऊ नये म्हणून प्रयत्न केले परंतु आम्ही हा प्रकल्प पूर्ण करून दाखवला आहे. हा महामार्ग कमी वेळेत बनला आहे.
विदर्भाच्या विकासासाठी 'समृद्धी' आवश्यक - नितीन गडकरी
विदर्भाच्या विकासासाठी समृद्धी आवश्यक आहे. नागपूर ते पुणे हा रास्ता पण लवकरच होईल. नागपूर ते पुणे सहा तासात पोहोचणार आहे. त्याचबरोबर आम्ही आणखी 6 रास्ते बनवत आहोत. हैदराबाद, पुणे, औरंगाबाद, चेन्नई असे अनेक महामार्ग लवकरच तयार होईल. नागपूरवरून इतर शहरांना जोडणारे मार्ग लवकरच सुरू होतील. असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
विकास कामांच्या लोकार्पण झाल्यानंतर मोदींची सभा
नागपूरकरांसाठी ऐतिहासिक दिवस! पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार एम्सचं लोकार्पण
नागपूरकरांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते थोड्याच वेळात एम्सचं लोकार्पण करणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. नागपूर शिर्डी टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत.
पंतप्रधानांचा ताफा जाईपर्यंत नागपुरातील वाहतूक थांबवणार
पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील त्या-त्या ठिकाणची वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली जाणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
PM मोदींनी केला मेट्रोतून प्रवास
PM मोदी नागपूर मेट्रो मधून प्रवास करत आहेत.
मोदींकडून वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा
मोदींकडून वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे.
PM मोदी नागपुरात दाखल; समृद्धी महामार्गावरून करणार प्रवास
समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. तर समृद्धी महामार्गावरूनही प्रवास करणार आहेत. तर ते विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत.
मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक
मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या रुळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणांच्या तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर हा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे लोकलसेवा उशिराने धावणार आहे.
खडसे की महाजन? कोण उधळणार गुलाल, जळगाव जिल्हा दूध संघाचा आज निकाल
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी काल 100 टक्के मतदान झालं होतं. ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
समृद्धी महामार्गाचं आज PM मोदींच्या हस्ते लोकार्पण; 75,000 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी
आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 55 हजार कोटींचा खर्च असलेला समृद्धी महामार्ग देशाला समर्पित केला जाणार आहे त्यासाठी प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील रु. 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत.