दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
sakal breaking notifiction
sakal breaking notifictionesakal

101 टक्के आपल्याला राजकारणात उतरायचं आहे- संभाजीराजे

नाशिकमध्ये वाढदिवसानिमित्त संभाजीराजेंच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी बोलतांना संभाजीराजे म्हणाले की, मला महाराष्ट्राकडून भरभरुन प्रेम मिळालं आहे. चळवळीत काम करतांना कार्यकर्त्यांवर खटले दाखल झालेले आहेत. आता थांबायचं नाही. आपल्यालाही राजकारणात उतरायचं आहे. स्वराज्य संघटना १०१ टक्के राजकारणात उतरेल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

दिल्ली एक्साईज प्रकरणामध्ये खासदाराच्या मुलाला अटक

दिल्ली एक्साईज पॉलिसी प्रकरणामध्ये वायएसआर काँग्रेसचे खासदार मगुंता श्रीनिवासुलू रेड्डी यांचा मुलगा राघव मगुंता यांना आज ईडीने अटक केली असून कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं.

तुर्कीतील बेपत्ता भारतीयाचा मृतदेह सापडला

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकाच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. अंकारा येथील भारतीय दूतावासाने याबाबत ट्वीट केले आहे.

पत्रकार वारिसेंच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन होणार- फडणवीस

पत्रकार वारिसेंच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

ठाकरे गटाचे नेते नरेश मणेरा यांना अटक

ठाकरे गटाचे नेते नरेश मणेरा यांना ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अटक केली. कलम 354 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात

बुलडाणा येथे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांना लाठीचार्ज केला आहे. आंदोलनाचं नेतृत्व करणारे रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची माहिती मिळतेय.

मुख्यमंत्री शिंदेंची कोल्हापूरच्या कणेरी मठाला भेट

कोल्हापूरच्या कणेरी मठाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेंद्रीय शेतीचे फायदे विषद केले. पंचमहाभूते लोकोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री बोलत होते.

वारिशेंच्या हत्येच्या प्रश्नावर नारायण राणे संतापले

Warishe Murder Case : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले. शशिकांत वारिशे यांची हत्या का झाली, कशी झाली हे पोलिस तपासात समोर येईल. संजय राऊत, विनायक राऊत यांच्या आरोपांची मी दखल घेत नाहीत. ते काही देशाचे मोठे नेते नाहीत, असे नारायण राणे म्हणाले. 

पूर्वी एकाच पक्षाला झेंडा फडकवण्याची परवानगी होती, पण आता..; मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Tripura Assembly Election : त्रिपुरामध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांकडून सातत्यानं मोर्चेबांधणी सुरू आहे. याच भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी त्रिपुरातील अंबासा इथं विजय संकल्प रॅलीला संबोधित करत आहेत. पीएम मोदी म्हणाले, 'हिंसा आणि मागासलेपण ही आता त्रिपुराची ओळख राहिलेली नाही. त्रिपुरामध्ये यापूर्वी एकाच पक्षाला झेंडा फडकावण्याची परवानगी होती. मात्र, आज भाजप सरकारनं (BJP Government) त्रिपुराला भीती, दहशत आणि हिंसाचारातून मुक्त केलंय.'

पोटनिवडणुकीसाठी अमित शाह मैदानात; भाजपच्या एक दोन नाही तर तब्बल 40 स्टार प्रचारकांची नावे 

पोटनिवडणुकीसाठी थेट देशाचे गहमंत्री अमित शाहदेखील पुण्यात येणार आहे. त्याचबरोबर भाजपचे 40 स्टार प्रचारकदेखील पोटनिवडणुकीच्या प्राचारसाठी पुण्यात येणार आहे.

या नावांचा समावेश

चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ,विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीश बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रवींद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडीक,आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे अशा चाळीस जणांचा प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

देवेंद्र फडणवीस,पंकजा मुंडे एकाच कारमधून आल्यामुळे चर्चेला उधाण

भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरू झाली आहे. आज या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी विचारमंथन करताना दिसतील. या बैठकीसाठी आज पंकजा मुंडे आणि देवेद्र फडणवीस हे एकाच कारने आले आहेत त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

रविकांत तुपकरांकडून पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न

रविकांत तुपकरांकडून पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. गेले चार दिवस ते भूमिगत झाले होते. आज त्यानी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांच्या वेशात येऊन त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

पुण्यात शिवसेना बंडखोर राहुल कलाटेंविरोधात बॅनरबाजी

एका अपक्षची उमेदवारी खोक्यातून... नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दरी, एकदम ओक्के डोक्यातून... खरा शिवसैनिक अशा आशयाचा मजकूर लिहून राहुल कलाटे यांना विरोध दर्शविला आहे. या बॅनरची सद्या चर्चा सुरू झाली आहे. राहुल कलाटे यांनी अर्ज मागे न घेतल्याने शिवसेना त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे देखील शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख सचिन आहीर यांनी देखील सांगितले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत शिवसैनिकांकडूनच कलाटे यांना विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.


पत्रकार वारिसे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा; रिफायनरी विरोधकांचा कोकणात मोर्चा

राजापूर तहसील कार्यालयावर रिफायनरी विरोधी संघटनेचे कार्यकर्ते धडकले असून वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यूमागील सूत्रधार कोण? याचा शोध घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

तुमचाही शशिकांत वारिसे करू, संजय राऊत यांना धमक्यांचे फोन

कोकणात पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. या मृत्यू प्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आवाज उठवल्याने संजय राऊत यांनाही धमक्यांचे फोन आले आहे. तुमचाही शशिकांत वारिसे करू, अशा धमक्या संजय राऊत यांना आल्या आहेत. राऊत यांना फोनवरून या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे राऊत यांनी वारिसे यांची हत्या आर्थिक घोटाळ्यातूनच झाल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी हा आरोप केला आहे.

शशिकांत वारिसे मृत्यूप्रकरणी चौकशीप्रकरणी मोर्चा

रत्नागिरी जिह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली. वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. ही घटना अपघात आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु ही हत्या असल्याचे उघड झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.


"टायगर अभि जिंदा है"..."टायगर इज बॅक"; धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी परळी सज्ज

उद्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे तब्बल 40 दिवसानंतर परळीत येत असून त्यांचे अभुतपुर्व जल्लोषात जंगी स्वागत होणार आहे. त्याचबरोबर शहरात रॅली काढल्यानंतर सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा देखील होणार आहे.

राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात यांना भाजपकडून खुली ऑफर

भाजप प्रवक्ते राम शिंदे यांनी देखील पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. राम शिंदे शुक्रवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे.

तसेच भाजप हा देशात सर्वात मोठा पक्ष आहे.यामुळे कोणत्याही पक्षातील कोणी नेते दु:खी,किंवा अडचणीत असतील त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांना भाजप आसरा देण्यासाठी तयार आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होणार? शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

"कोणाला काहीही आवडेल पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडं शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळं त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही" राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी नुकतंच कार्यकर्त्यांना उद्देशून एक जाहीर विधान केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं की, "आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल आपल्यालाला आता अजितदादांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळं कामाला लागा" विशेष म्हणजे अजित पवारांसमोरच त्यांनी हे विधान केलं होतं. लंकेबरोबरच राष्ट्रवादीच्या इतरही अनेक आमदारांची आणि कार्यकर्त्यांनी अशीच इच्छा असल्यानं लंकेंच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.


देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com