दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
sakal breaking notifiction
sakal breaking notifictionesakal

कोश्यारींनी महाराष्ट्राची सेवा केली- फडणवीस

मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला. त्यांनी त्याबाबत क्लेरिफिकेशन दिलेलं होतं. परंतु मविआ नेत्यांचा त्यांच्यावर राग होता. हा चॅप्टर संपला आहे. कोश्यारींनी महाराष्ट्राची सेवा केली, त्यांचे आभार मानतो; अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या.

उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे

मुंबईमध्ये आज उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्यात बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्याकडे दोन व्यक्ती भेटल्यानंतर राम-राम घालतात. तर तुमच्याकडे जय श्रीराम म्हणातात. शेवटी राम आहेच. मी अयोध्येला जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथून माती घेतली आणि मग रामलल्लाच्या दर्शनाला गेलो. माघारी आल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, अशी आठवण त्यांनी सांगितली.

उद्धव ठाकरे ३० मार्च रोजी पोहरादेवीला जाणार

उद्धव ठाकरे ३० मार्च रोजी पोहरादेवीला जाणार आहेत. सुनील महाराज यांनी यासंदर्भात वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी येथील मेळाव्याला हजेरी लावली होती.

आरे परिसरात आंदोलक-पोलिसांमध्ये संघर्ष

आरे परिसरामध्ये राम मंदिराशेजारी कब्रस्तान न बनवण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये चमकम झाली. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महाविकास आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात - उदय सामंत

सोलापूर : महाविकास आघाडीला लवकरच मोठं भगदाड पडणार आहे. तब्बल 20 ते 22 आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच ते भाजपात (BJP) येतील, असा मोठा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला. माढा (Madha) तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात सामंत बोलत होते.

बदलापूर एमआयडीसीमधील कंपनीला लागली आग

आज (रविवार) बदलापूरच्या एमआयडीसीमधील कंपनीमध्ये आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोळ पाहायला मिळाली. परिसरात गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण होतं. मिळालेल्या माहितीनुसार, गगनगिरी केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलांच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पत्रकार शशिकांत वारिसेंच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबाला 25 लाखाची मदत सरकारनं जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मदत जाहीर केली. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

LIVE Update : तांबे कुटुंबियांच्या समर्थनार्थ पेठ तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पदवीधर निवडणुकीत तांबे विरुद्ध पटोले असा सुरू असलेला वाद आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहचला. थोरात यांच्या राजीनाम्यानंतर आता नाशकात आता राजीनामा सत्र सुरू झाले आहे.

दुरुस्तीचे काम सुरू असताना घर कोसळून 2 जणांचा मृत्यू

भांडुप पश्चिम येथील खिंडीपाडा येथे दुरुस्तीचे काम सुरू असताना घर कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला. १९ वर्षीय राजकुमार धोत्रे असे मृताचे नाव आहे

पुण्यात आजपासून महाविकास आघाडीची प्रचाराची रणधुमाळी सुरु

पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारासाठी यात्रेवर भर आहे.

कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत करतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकाही सोडली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राची सुटका झाली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रासह या राज्यांचे राज्यपाल बदलले 

  • रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र

  • लेफ्टिनेंट जनरल कैवल्य त्रिविक्रम, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश

  • लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम

  • सीपी राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड

  • शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश

  • गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसम

  • निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश

  • बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ़

  • अनुसुईया उइके, राज्यपाल, मणिपूर

  • एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड

  • फागू चौहान, राज्यपाल, मेघालय

  • राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार

  • ब्रिगेडियर (रिटायर्ड) बीडी मिश्रा, उपराज्यपाल, लडाख

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस कोण आहेत?

वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. देशातील १३ राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहे. त्यात भगतसिंह कोश्यारी यांचा समावेश आहे. आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे

रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले. सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यापालांची नियुक्ती केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे.

IND vs AUS: तिघही माहीर! आधी कुणाला गोलंदाजी द्यायची; कॅप्टन रोहितला पडला प्रश्न

पहिला कसोटी सामना इतक्या लवकर संपेल असे वाटले नव्हते. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव एका सत्रात आटोपला जाईल असा विचार तर अजिबात केला नव्हता. याचे संपूर्ण श्रेय आपल्या तीन दादा फिरकी गोलंदाजांना जाते ज्यांनी अव्याहतपणे समोरच्या फलंदाजांवर दडपण ठेवले. अश्विन, जडेजा आणि अक्षर संघात असल्याचा मोठा फायदा आहे. तिघांपैकी कोणाला मारा करायला बोलवायचे हा माझ्यासमोर प्रश्न असतो. सगळेच गोलंदाजी करायला सतत उत्सुक असतात, अशी प्रशंसा कर्णधार रोहित शर्माने पहिल्या कसोटी सामन्यानंतर केली.

पुण्यात पोटनिवडणुकीसंबधी पोस्टरनंतर आता ऑडिओ क्लिप व्हायरल

पुण्यातील कसाब आणि चिंचवड पोटनिवडणूक राज्यभयर चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसात पुण्यात बॅनरची चर्चा सुरू होती. आता या पोटनिवडणुकीच्या संबधी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत बॅनरबाजी सुरू असताना निवडणुकीचा 15 दिवस प्रचार करा आणि 7 हजार रुपये मिळवा, अशी एक ऑडिओ क्लिप सध्या पुण्यात चर्चेचा विषय बनली आहे.


थोरातांच्या समर्थनार्थ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे विरुद्ध पटोले असा सुरू झालेला वाद आता काँग्रेसमधील राजीनाम्यापर्यंत पोहचली आहे. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये पटोले आणि थोरात असे दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचेच काम केल्यानं काँग्रेसमध्ये तांबे यांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर नाराजी पसरली होती. त्यानंतर गटनेते पदाचा राजीनामा देखील बाळासाहेब थोरात यांनी दिल्यानंतर काँग्रेसच्या वर्तुळात नाराजीचा सुर दिसून येऊ लागला आहे. त्यातच आता बाळासाहेब थोरात यांच्या गटनेते पदाच्या राजीनाम्यानंतर आता नाशिकमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, हे असणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com